मुख्याधिकाऱ्यांच्या खासगी वाहनांवर चालक म्हणून नगरपरिषदेचा कर्मचारी. मुद्दामहून पाथरी येथून सेलूला लाडक्या कर्मचारीची नियुक्त. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 12 मई 2018

मुख्याधिकाऱ्यांच्या खासगी वाहनांवर चालक म्हणून नगरपरिषदेचा कर्मचारी. मुद्दामहून पाथरी येथून सेलूला लाडक्या कर्मचारीची नियुक्त.

मुख्याधिकाऱ्यांच्या खासगी वाहनांवर चालक म्हणून नगरपरिषदेचा कर्मचारी.

मुद्दामहून पाथरी येथून सेलूला लाडक्या कर्मचारीची नियुक्त.


सेलू प्रतिनिधी
समशेर खान.
सेलू येथील नगर परिषदेला  मुख्याधिकारी अथवा नगराध्यक्ष यांना शासकीय वाहन नाही मात्र येथील मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी स्वतःच्या खासगी वाहनावर चालक म्हणून पाथरी येथून मुद्दामहून बदलून घेतेलेला लाडका कर्मचारी याची नियुक्ती केली आहे

    पाथरी येथील नगरपालिकेत शिपाई म्हणून कार्यरत असलेला एक लाडका कर्मचारी मुख्याधिकारी यांनी स्वतःच्या खाजगी गाडीवर घेण्याकरिता मुद्दामहून पाथरी येथून सेलू पालिकेत बदली करून नियुक्ती करण्यात आलेली आहे वास्तविक पाहता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्ष कुठल्याही प्रकारचे शासकीय वाहन नाही मात्र नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यास स्वतःच्या खाजगी वाहनांवर नियुक्ती देऊन उर्वरित वेळेत स्वतःच्या घरचे इतर काम करून घेतले जातात हे कितपत योग्य आहे तरी याबाबत जिल्हा अधिकारी यांच्याकडून तात्काळ चौकशी करण्यात येऊन मुख्य अधिकारी अथवा अन्यत्र नगरपालिकेचा कर्मचाऱ्यांना वापर करण्यात येऊ नये अशी मागणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमधूनच होत आहे

याव्यतिरिक्त संबंधित कर्मचारी हा  साहेबाकडे काम करत असल्याचे दाखवून कार्यालयात मात्र फिरकत सुद्धा नाही हा कर्मचारी मुख्याधिकारी यांच्या गाडीवर चालक म्हणून व मुख्याधिकारी यांच्या कॉटवर सेवक म्हणून दिवसभर काम करत असल्याचे दाखवण्यात येते मात्र ही सर्वच गोष्ट अनधिकृत व बिन बोभाट चालत आहे अशा प्रकाराबाबत  संपूर्ण शहरात  मोठ्या चवीने  याची चर्चा मात्र ऐकण्यात येते 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें