एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने ह भ प बालकीर्तनकार प्रकाश महाराज फड यांना " समाजभूषण पुरस्कार 2018" जाहीर.
परळी प्रतिनिधी :- एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने ह भ प बालकीर्तनकार प्रकाश महाराज फड (विद्यार्थी ज्ञानाई गुरुकुल सेलू) रा.कन्हेरवाडी, ता.परळी,जि.बीड यांना यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार 2018 जाहीर करण्यात आला आहे.
वारकरी क्षेत्रात वयाच्या नवव्या वर्षीपासून किर्तन, मृदंग या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, तुकाराम देवीदास मुंडे रा.वाणटाकळी यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकता गौरव पुरस्कार 2018 जाहीर करण्यात आला आहे तसेच मुरलीधर भागवत मुंडे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकता गौरव पुरस्कार 2018 जाहीर करण्यात आला आहे.
तरी खालील मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
संजय निरुपम मा.खासदार तथा अध्यक्ष मुंबई काँग्रेस आय.,मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, नरेंद्र वि.वाबळे मराठी पत्रकार संघ मुंबई, चित्रपट अभिनेते अनिल मोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा. टी.पी.मुंडे सर प्रदेश सरचिटणीस काँग्रेस आय तथा प्रांताध्यक्ष एकता सेवाभावी संस्था, मुख्य अतिथी म्हणून मा. आमदार विक्रम काळे शिक्षक मतदार संघ औरंगाबाद,मा.आमदार ज्ञानराज चौगुले आमदार उमरगा, आमदार रामराव वडकुते , मुख्य संयोजक अजमत खान संस्थापक अध्यक्ष एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र तथा चित्रपट दिग्दर्शक मिस कॉल.
प्रमुख उपस्थिती सिनेअभिनेत्री मुंबई प्रेमा किरण, सिनेअभिनेत्री मुंबई सुदेशना नावकार, मिस कॉल चित्रपटाचे अभिनेता अरबाज खान ,प्रांत सल्लागार ऍड.बारी सिद्दीकी , मा.प्रा.सत्येंद्र राऊत साहित्यकार उस्मानाबाद, मा.अरुणजी मराठे प्रसिद्ध उद्योजक परभणी, अरुण पडघम, दादाराव दाडगे यांच्या वतीने सोमवार दि.14 मे 2018 रोजी दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार भुवन आझाद मैदान बाळशास्त्री जांभेकर चौक मनपा मुंबई येथे संपन्न होणार आहे तरी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें