मुख्याधिकारी यांच्या विरोधात 18 मे पासून डासाळकर यांचे आमरण उपोषण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 11 मई 2018

मुख्याधिकारी यांच्या विरोधात 18 मे पासून डासाळकर यांचे आमरण उपोषण.

मुख्याधिकारी यांच्या विरोधात 18 मे पासून डासाळकर यांचे आमरण उपोषण.

अहवाल सादर न करणाऱ्या मुख्याधिकारी वर कार्यवाहीची  मागणी.




सेलु :प्रतिनिधी
समशेर खान.

नगरपालिकेच्या 45 मालमत्ता विक्री प्रकरणातील अहवाल व  आपले सरकार पोर्टल वरील तसेच मंत्रालयातून विविध 4 प्रकरणात

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशा चालू असून संबंधित चौकशीचा अहवाल मुख्याधिकारी नगर परिषद सेलू हे हेतुपुरस्सरपणे टाळाटाळ करत असून अहवालातील मुख्य मुद्दे टाळल्या जात आहेत सेलू येथील उपजिल्हा अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना शिस्तभंगाची पत्र दिले आहे दिलेले आहे मात्र त्यानंतरही  मुख्य अधिकारी हे सदरील पत्राची दखल न घेता संबंधित प्रकरणात कुठल्याच प्रकारचा अहवाल देत नाहीत त्यामुळे मंत्रालयातील चौकशीला व कार्यवाहीला गती मिळत नसल्यामुळे सदरील प्रकरणात कुठलीच कार्यवाही होत नसल्यामुळे दिलीप डासाळकर हे शुक्रवार दिनांक 18  मे रोजी सहाय्यक जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत

सदरील सर्वच प्रकरणांमध्ये मुख्याधिकारी हे प्रकरणातील मूळ गाभाच काढून टाकत आहेत तसेच 45 मालमत्ता विक्री प्रकरणातील घेतलेल्या नगरपरिषदेचा ठराव याचा उल्लेख देखील करत नाहीत तसेच सेलू येथील सर्वे नंबर 232 मधील प्रकरणात सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी स्पष्टपणे आदेश दिलेली असताना तत्कालीन मुख्याधिकारी व मूळ जमीन मालक यांच्यावरही कुठलीच कार्यवाही अद्याप पर्यंत झालेली नाही त्यामुळे आशा कामचोर मुख्य अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी दिलीप डासाळकर यांनी केली आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें