सराटी गावच्या शेतक-यांचा सातबारा जुळेल का ?
शिवरस्ते - पाणंद रस्ते मोकळे करण्याची मागणी.
सराटी (संतोष लहाने ) दि 10सराटी गावच्या शेतक-यांचा सातबारा जुळेल का ?अशा अनेक शेतक-यांच्या तक्रारी असतांना शिवरस्ते - पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी
तहसिलदारांकडे तक्रारी दाखल होऊनही येथील
शेतक-यांना न्याय मिळत नसल्याने खरिप हंगामासाठी आपापल्या शेतांमध्ये खते बि- बियाणे न्यावेत तरी कसे असे संकट येथील शेतक-यांवर ओढवले आहे.
सराटी येथील अनेक शेतक-यांनी शिवरस्ते - पाणंद रस्ते बळकावले आहेत. या शिवरस्त्यांवरील तसेच पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात येत नसल्याने येथील शेतकरी - शेतमजुरांना मालवाहतूकी बरोबरच शेती मशागतीसाठी खुपच ञास सहन करावा लागत आहे. यावर्षी वेळेवरच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकरी - शेतमजुरांची खरिप पुर्व मशागती कामे जोरात सुरु आहे. मिरची रोपांची नव्याने लागवड करण्यात येत आहे. वखरणी - नांगरणी कामे करण्यात शेतकरी - शेतमजुरांची धांदल सुरु आहे. यंदा हवामान खात्याने पाऊस वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने खरिप पुर्व मशागती कामांना चालना मिळाली असली तरी सराटी परिसरातील शिवरस्ते - पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात येत नसल्याने येथील शेतकरी - शेतमजुरांना शेती मशागतीची कामे करतांना खुपच अडचणी येत आहेत.
तर दुसरीकडे येथील अनेक शेतक-यांच्या सातबारांमध्ये अनेक ञृटी आहेत. अनेक शेतक-यांची क्षेत्रच जुळून येत नसल्याने येथील अनेक शेतक-यांनी क्षेत्र दुरुस्ती प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी तलाठी - मंडळ अधिकारी - तहसिलदारांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. सातबारांमध्ये झालेल्या चुकांबद्दल दुरुस्ती प्रकरणांचा निपटारा करण्याची गरज आहे. तसेच येथील अनेक शेतक-यांनी गोरगरिबांच्या जमीनी बळकावल्याचे तसेच शिवरस्ते - पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण केले असल्यानेच येथील गोरगरिब शेतकरी - शेतमजुर अनेक अडी - अडचणींचा सामना करीत आहे. सातबारा दुरुस्ती प्रकरणांचा निपटारा करण्याची गरज आहे तसेच परिसरातील शिवरस्ते - पाणंद रस्तेही मोकळे करण्यात यावे अशी मागणी सराटी येथील शेतकरी - शेतमजुरांमधून करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें