शिवसेनेशी 25 वर्षांचं ऋणानुबंध, काळजी असणारच : भुजबळ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 11 मई 2018

शिवसेनेशी 25 वर्षांचं ऋणानुबंध, काळजी असणारच : भुजबळ.

शिवसेनेशी 25 वर्षांचं ऋणानुबंध, काळजी असणारच : भुजबळ.


शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलेलो आहे, त्यामुळे ऋणानुबंध असतातच, असे म्हणत छगन भुजबळ यांनी उद्ध ठाकरेंनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, माझ्या पडत्या काळात शिवसेनेने दोन शब्द चांगले बोलले, याचे समाधानही आहे, असे भुजबळ म्हणाले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भुजबळ सांताक्रुझमधील त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रुग्णालयातून घरी परतलेल्या भुजबळांना पत्रकारांनी पहिली प्रतिक्रिया विचारल्यानंतर, ते म्हणाले, “झाले मोकळे आकाश, अशी भावना आहे.”

*शिवसेनेबद्दल नेमकं काय म्हणाले?*

“पडत्या काळात शिवसेनेने शब्दांचा का होईना, आधार दिला. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलो आहे. त्यामुळे काळजी असणारच. ऋणानुबंध असतातच.” असे छगन भुजबळ म्हणाले.

*भुजबळांची तब्येत कशी आहे?*

तसेच, “गेली साडेतीन महिने आजारपणामुळे त्रस्त होतो. अजूनही आजारपणातून पूर्णपणे बाहेर पडलो नाही. मात्र डॉक्टरांना विनंती केल्यानंतर त्यांनी जास्त त्रास घेऊ नका, असं सांगितलं आहे. परत हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागेल कदाचित. काही शस्त्रक्रिया कराव्या लागतील, त्यातून बरं वाटलं तर शंभर टक्के कार्यक्रमाला हजर राहणार.”, असे भुजबळांनी स्वत:च्या तब्येतीबाबत सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें