सिल्लाेडला पाणीपुरवन्यासाठी युध्दपातळीवर उपाययाेजना सुरु :- खेळना प्रकल्पात चर खाेदुन उपलब्ध हाेनार्या पाण्यातुन हाेनार पाणीपुरठा .
सिल्लाेड :-तालुका प्रतिनिधि दि.११
आजय बोराडे.
सिल्लाेड शहराला पाणीपुरठा करणारा खेळना प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने शहरातील एक लाख जनतेची तहान भागविन्यासाठी नगरपालीकेने युध्दपातळीवर उपाययाेजना हाती घेतल्या आहेत.
खेळना प्रकल्पातच तीन माेठे तीन चर पाण्यासाठी खाेदन्यात येत असून चरातुन उपलब्द हाेनार्या पाण्यातुन शहराला पाणीपुरठा करणार असल्याची माहीती माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
सिल्लाेड शहराला खेळना मध्यम प्रकल्पातुन पाणीपुरठा याेजना कार्यान्वित आहे.यंदा मात्र खेळना धरनक्षेत्रात काहीच पाउस न पडल्याने धरनात गतवर्षीचाच मृत साठा हाेता.याच पाणीसाठ्यावर सिल्लाेड नगरपालीतर्फे पाण्याचे नियाेजन करुन आजपर्यंत शहरवाशीयांची तहान भागविन्यात आली.धरनातील पाणीसाठा संपल्यानंतर सन २०१२ व १३ मधे आमदार अब्दुल सत्तार यांच्या कल्पनेतुन खेळना धरनात मारलेल्या चरातुन पाणीपुरठा सुरु करण्यात आला.मात्र या चरातील पाणीसाठा कमी पडल्याने व धरनक्षेत्रातील विहिरी तळाला लागत चालल्याने पाणीपुरठा करण्याचा माेठा प्रश्न उभा राहीला आहे.
निर्माण झालेल्या पाणीबाणीवर उपाय शाेधन्यासाठी सिल्लाेड नगरपालीकेने युध्दपातळीवर उपाययाेजना हाती घेतल्या आहेत.एक लाख सिल्लाेड वाशीयांची तहान भागविन्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करने अवघड असल्याने धरनातच सन २०१२ व १३ मधे चर पँटर्न राबविन्याचा निर्णय आमदार अब्दुल सत्तार यांच्या सुचनेने घेण्यात आला आहे.
धरनात ३० बाय १० मीटर बाय १० मिटर आकाराचे दाेन नवीन चर खाेदन्यात येत असून दाेन दिवसापूर्वीच हे काम हाती घेण्यात आले आहे.तर जुन्या चरातील साचलेला गाळ मशीनद्वारे काढण्यात येत आहे.नवीन चराला काही प्रमाणात पाणी लागले असून चराची लांबी रुंदी व खाेली वाढताच त्यात पाणीसाठा वाढेल अशी आशा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केली.
चाैकट :- आमदार सत्तार यांचा खेळना धरनात खडा पहारा !
दरम्यान निर्माण झालेल्या पाणीबाणीवर मात करण्यासाठी आमदार सत्तार हे तीन दिवसापासुन खेळना धरनावरील चर खाेदाई कामासाठी ठान मांडुन बसलेले आहेत.धरन क्षेत्रात पाउसच पडला नाही तरीही चरातुन प्रती मानसी शासनाच्या विस लिटर पाण्याऐवजी प्रती मानसी चाळीस लिटर पाणी पुरवनार आहे.
२०१२ साला प्रमाणे दुश्काळाचा सामना यावर्षी करावा लागत आहे.खेळनातील पाणीसाठा संपल्याने धरनातच दाेन चर खाेदन्याचे काम हाती घेतले असून चरातुन पाणी उपलब्ध हाेताच सिल्लाेड शहराला तीन दिवसात पाणी पुरवू अशी आशा आहे.
(आमदार अब्दुल सत्तार )

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें