मुस्लिम समाजाला विविध क्षेत्रात आरक्षण व सवलती देण्याची मागणी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 2 मई 2018

मुस्लिम समाजाला विविध क्षेत्रात आरक्षण व सवलती देण्याची मागणी .

मुस्लिम समाजाला विविध क्षेत्रात आरक्षण व सवलती देण्याची मागणी .

 सेलू : ( प्रतिनिधि )
समशेर खान.
           मुस्लिम समाजाला विविध  क्षेत्रात आरक्षण व सवलती देण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे उपजिल्हाधिकारी मार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे येथिल नगरसेविका शेख अख्तर बेगम म. अय्युब यांनी केली आहे.
      निवेदनात म्हटले आहे की, देशातील तसेच राज्यातील मुस्लिम समाजाची अर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखिची झाली आहे. शासकीय, निमशासकीय नौकरींमध्ये या समाजाचे प्रमाण नगण्य झाले असून उच्च शिक्षणातही हीच अवस्था आहे. मा. उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजास शिक्षण क्षेत्रात आरक्षणाची परवानगी दिली होती परंतू दुर्देवाने ते लागू करण्यात आले नाही.
     मुस्लिम समाजात मोल मजुरी करुन पोट भरणारे 97% च्या जवळपास असुन, सारेच कामगार अकुशल आहेत; त्यामुळे त्यांच्या जिवनात सुधारणा होने आवश्यक आहे.
     देशाचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी मुस्लिम समाजाचेही उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे.
      मुस्लिम समाजाचा सर्वांगिन विकास साधण्यासाठी  शासकीय, निमशासकीय, उच्च व व्यावसायिक शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे तसेच फी मध्ये सवलत द्यावी, रोजगार उभारण्यासाठी विशेष योजना आखुन कर्ज उपलब्ध करुन द्यावे अदि मागण्या करण्यात आल्या आहेत.
          उपजिल्हधिकारी सेलू मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनावर नगरसेविका शेख अख्तर बेगम म. अय्युब यांची स्वाक्षरी आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें