मोंढ्यात दरोड्याचे साहित्य सापडल्याने खळबळ.
समशेर खान.सेलू प्रतिनिधी
सेलू येथील मोंढा परिसरात खरेदी-विक्री संघाच्या पाठीमागे एका टपरीजवळ अज्ञात चोरट्यांनी ठेवलेले दरोड्याचे साहित्य मंगळवार 15 मे रोजी सकाळी 7 च्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मोंढा परिसरात खरेदी-विक्री संघाच्या पाठीमागे असलेल्या एका टपरीजवळ मोंढ्यातील शोधालायाच्या रस्त्यावर दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य यामध्ये लोखंडी पहार ,कत्ती, आरा पत्ती , माकड टोपी , कटार इत्यादी असे साहित्य मंगळवारी पहाटे 7 च्या सुमारास आढळून आले होते हे साहित्य सापडल्याच्या चर्चेने तेथे पाहण्यासाठी गर्दी वाढली दुपारी 12 च्या सुमारास पोलिसांना कळविण्यात झाले व तसेच हे सर्व साहित्य त्यांनी जप्त केले मोंढ्यात दरोड्याचे साहित्य आढळून आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नेमका हा काय प्रकार आहे हे मात्र समजू शकले नाही

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें