शेगावात पोलिस पाटील एकीकरण समितीचे राज्यस्तरीय महासंमेलन.
◾परभणी जिल्ह्यातील पोलिस पाटलांनी उपस्थित राहण्याचे अशोक गोरे यांचे आवाहन.
सेलू,प्रतिनिधी.
समशेर खान.
प्रशासनीक कार्य करीत असतांना पोलिस पाटलांना दैनंदिन भेडसावणार्या समस्यांवर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन तथा पोलिस पाटलांच्या असणार्या विविध मागण्या संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोलिस पाटलांचे राज्यव्यापी महासंमेलन बुधवार १६ मे रोजी आयोजीत करण्यात आले आहे.
या महासंमेलनास परभणी जिल्ह्यातील पोलिस पाटलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेलू तालुक्यातील राधे-धामनगाव येथील पोलिस पाटील अशोक गोरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील पोलिस पाटलांच्या दिवसेंदिवस भेडसावणार्या समस्या, शासनाचा अडमुठेपणा, वाळुमाफिया, नक्षलवादी आदींचे वाढते हल्ले या व अन्य संकटांना समर्थपणे तोंड देण्यासाठी राज्यात विखुरलेल्या पोलिस पाटलांचे एकीकरण होण्याच्या दृष्टीने सर्व संघटना समावेशक एकीकरण समिती स्थापन करण्यासाठी हॉटेल श्रीकृष्ण कॉटेज कॉन्फरस हाॅल खामगाव रोड शेगाव जि. बुलढाणा येथे बुधवार १६ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्यव्यापी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकरण समर्थक पोलिस पाटील बांधवांनी आपल्या जिल्ह्यातुन प्रतिनिधींनी लेखी सुचनासह उपस्थित राहुन या नियोजीत संमेलनात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य एकीकरण समितीचे संयोजक सुजय देशमुख व बुलढाणा पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मनोहर पाटील तसेच सेलू तालुक्यातील राधे धामनगाव येथील पोलिस पाटील अशोक गोरे यांनी केले आहे.
परभणी जिल्ह्यातुन या एकीकरण समितीच्या बैठकीस अशोक गोरे यांच्या सह संगीता कचरे, शिवलिला स्वामी, सारिका कटारे, रामेश्वर जाधव, सुनिल ताठे, तुळशीदास मगर, दत्ता नाईकनवरे, संजय गजमल, गोपीनाथ वाघमारे, रामचंद्र पारवे, नरहरी कटारे, सुदर्शन मगर आदीजण उपस्थित राहणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें