औरंगाबादेत पुन्हा तणाव..शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळांना पोलिसांनी घेतले ताब्यात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 16 मई 2018

औरंगाबादेत पुन्हा तणाव..शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

औरंगाबादेत पुन्हा तणाव..शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

औरंगाबाद- शहरातील मोतीकारंजा, राजाबाजार आणि शहागंजमध्ये शुक्रवार, शनिवारी उसळलेल्या दंगलीप्रकरणी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जंजाळ यांना ताब्यात घेण्यासाठी दोन पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त, एसरपीएफची कंपनी असा तगडा पोलिस फौजफाटा शिवाजी नगरात पोहोचला होता. जंजाळ यांची घरात चौकशी करून पोलिसांनी त्यांना अक्षरश: खांद्यावर बसवून घरातून बाहेर आणले. नंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीतून जंजाळ यांना पोलिसांना न्यावे लागले.
शिवाजी नगरात तणाव...
शिवसेना प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे आदी वरिष्ठ नेते दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर शिवाजी नगर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. परिसरात तगडा बंदोबस्त तैनात आहे. राजेंद्र जंजाळ यांना अटक करण्‍यासाठी पोलिस त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा शिवाजी नगरात शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला.
राजेंद्र जंजाळ यांच्या घराबाहेर मोठा जमाव जमला होता. शिवाजीनगरातील बाजारपेठ बंद करण्यात आली. दोन पोलिस उपायुक्तांनी घरात जाऊन राजेंद्र जंजाळ यांच्याशी चर्चा केली. पोलिसांनी राजेंद्र जंजाळ यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच शिवसेना कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणाव वाढला आहे. 'राजेंद्र जंजाळ यांना आम्ही केवळ चौकशीसाठी नेतोय, अटक नाही', अशी पोलिस सारवासारव करत आहेत.
दुसरीकडे, राजाबाजार परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. सोमवारी सुरु करण्‍यात आलेला राजाबाजार मंगळवारी सकाळी पुन्हा बंद करण्‍यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें