दशक्रिया विधिनिमित्त 500 ग्रंथ वाटप. स्वतःच्याच शेतात अस्ति विसर्जन करुण वृक्ष लागवड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 13 मई 2018

दशक्रिया विधिनिमित्त 500 ग्रंथ वाटप. स्वतःच्याच शेतात अस्ति विसर्जन करुण वृक्ष लागवड.

दशक्रिया विधिनिमित्त 500 ग्रंथ वाटप.

स्वतःच्याच शेतात अस्ति विसर्जन करुण वृक्ष लागवड.

लक्ष्मणराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ हौदाचे भूमिपूजन.

आजय बोराडे.
पिशोर /नाचनवेल येथून जवळच असलेल्या पींपरखेड़ा  ता.कन्नड येथील कैलाशवासी लक्ष्मण फकीरराव गायकवाड यांच्या दशक्रिया विधिनिमित्त येथील शेतात ज्या ठिकाणी कै.लक्ष्मणराव गायकवाड यांनी वडिलोपार्जित असलेल्या जमिनित घाम गाळून आपले आयुष्य खर्ची घालून मळा फुलवला व नारळ,आंबे,जांभूळ,जांब,साग,चिंच, आदि फळ देणाऱ्या वृक्षासह इतर रुक्ष लागवड करुण मोठी केलि.त्याच मळ्यात त्यांच्या अस्थिविसर्जन करुण नंतर आम्रवृक्षा,जांभूळ, चिंच ,फनस आदि वृक्षाची लागवड करुण  कै.गायकवाड यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण आदरांजलि वाहन्यात आली.

आलेल्या नातेवाईक,मित्रपरिवारास,मान्यवरास छत्रपति शिवरायाचां खरा इतिहास माहित व्हावा या अनुषंगाने दिवंगत कॉमरेड गोविंद पानसरे लिखित ''शिवाजी कोण होता ? ''या 500 ग्रंथाचे वाटप करण्यात आले.

तसेच लक्ष्मणराव गायकवाड़ यांच्या स्मरणार्थ  पिण्याच्या पाण्याच्या हौदाचे उदघाटन समाजप्रभोधनकर  सुनील महाराज बेटावतकर ,शिवसेना प्रमुख अंबादास दादा दानवे यांच्यासह मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नातेवाईक,मित्रपरिवार व पींपरखेड़ पंचक्रोशितिल मान्यवर,ग्रामस्थ  उपस्तिथ होते.

दशक्रियाविधि निमित्त श्री.सुनील महाराज बेटावतकर यांची समाप्रबोधनपर कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्यांनी 'याच साठी केला होता अट्टहास ,शेवटचा दिस गोड व्हॉवा ' या संत तुकारामांच्या  अभंगातिल ओवीवर आधारित मत व्यक्त केले.ते यावेळी म्हणाले की कर्मयोग,ज्ञानयोग,भक्तियोग यांचा अवलंब करुण जीवन सार्थकी लावावे.अध्यात्माची कास व सदसद विवेक बुद्धिचा वापर करुण मानवाने जर आपला जीवन मार्ग निवडला तर निच्छितच संपूर्ण जीवन सुजलाम ,सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाहीत.

ते पुढे म्हणाले की वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे!पक्षी ही सुस्वरे आळवीती !! येने सूखे रुचे एकतांचा वास ! नाही गुण दोष अंगा येत !! हा तुकोबांचा अभंग प्रमाण मानुन कै.लक्ष्मण बाबा यांच्या मुला -बाळांनी  ज्या शेतात ते राबले त्याच शेतात त्यांचे अस्थि विसर्जन करुण पर्यावरण पूरक संदेश दिला.

यावेळी दुःखद समय सहभागी मान्यवरांचे स्वागत कै.लक्ष्मणराव गायकवाड यांच्या मुला-मुलांनी ''शिवाजी कोण होते ?'' हे डॉ.गोविंद पानसरे लिखित पुस्तक देऊन स्वागत करुण,ऋण व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें