भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहांगीर येथे भारीप बहुजन महासंघ शाखेचे उद्घघाटन.
शे.सलिम.भोकरदन (प्रतिनिधी )तालुक्यातील बोरगाव जहांगीर येथे रविवार दिनांक 13 मे रोजी माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारीप बहुजन महासंघ शाखेचे उद्घघाटन पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष दिपक डोके यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष शेख लाला मामू , जिल्हा सचिव विनोद दांडगे, अॅड. हर्षवर्धन प्रधान, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष रमण पगारे, गौतम पगारे, पत्रकार कमलकिशोर जोगदंडे, दांडगे साहेब आदी उपस्थित होते.
यावेळी शाखा उदघाटन समारंभानंतर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्ष पदी विनोद दांडगे, उपाध्यक्ष राहूल दांडगे, सचिव भरत दांडगे, कोषाध्यक्ष रत्नपाल दाभाडे, सहसचिव अमोल दांडगे, यांच्या सह रावसाहेब दांडगे, सागर इंचे , रमेश दांडगे, छगन दांडगे, भाऊसाहेब दांडगे, गौतम दांडगे, गजानन दांडगे, प्रमोद काळे, कृष्णा दांडगे, आदींचा कार्यकारिणी त समावेश करण्यात आला.
यावेळी सर्व उपस्थित समाज बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें