खोडकाईवाडी येथे मोफत पाणी पुरवठा सुरू; पाणी जपून वापरा - नगराध्यक्ष - अब्दुल समीर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 13 मई 2018

खोडकाईवाडी येथे मोफत पाणी पुरवठा सुरू; पाणी जपून वापरा - नगराध्यक्ष - अब्दुल समीर.

खोडकाईवाडी येथे मोफत पाणी पुरवठा सुरू;

पाणी जपून वापरा - नगराध्यक्ष - अब्दुल समीर.


सिल्लोड (प्रतिनिधी) दि 13
सिल्लोड शहरासह वाडी - वस्ती - तांड्यांवरील नागरिकांची तहान भागविणारे खेळणा मध्यम प्रकल्प पुर्णपणे आटले असुन नगरपरिषदेने वेळीच उपाययोजना करीत नव्याने चर खोदकामास सुरुवात करण्यात आली असुन पाण्याचा अपव्यय करु नये , पाणी जपून वापरावे असे आवाहन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.
सिल्लोड शहरानजीक असलेल्या खोडकाईवाडी येथे नगरपरिषद अंतर्गत मोफत पाणी पुरवठा सुरू करून पाण्याची प्लॅस्टिक टाकी उपलब्ध करुन देण्यात आली. नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते पाणी पुरवठा प्लॅस्टिक टाकीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड ,नगरसेवक राजरत्न निकम,राजू दुधे,जगन्नाथ कुदळ,संदीप हाडोळे, फईम पठाण,यांच्यासह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें