राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत वालूर येथील जि.प.कें.प्रा.कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांची बाजी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 27 मई 2018

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत वालूर येथील जि.प.कें.प्रा.कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांची बाजी.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत वालूर येथील जि.प.कें.प्रा.कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांची बाजी.

शाळेत वर्षभर राबविलेल्या गुणवत्ता विकास कार्यक्रमामुळेच घवघवीत यश मिळाल्याची मुख्याध्यापक अनंतकुमार देवळेंची निकालानंतर प्रतिक्रिया.



सेलू प्रतिनिधी
समशेर खान.
३ डिसेंबर २०१७ रोजी राज्यभर घेण्यात आलेल्या (NMMS -- National means Cum merit scholarship scheme) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला.त्यात सेलू तालुक्यातील वालूर येथील जि.प.कें.प्रा.कन्या शाळेच्या ५ विद्यार्थीनी उत्तीर्ण होऊन केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी पाञ ठरल्या.


शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक साहाय्य देत त्यांची बौद्धिक क्षमता विकसित करणे अन् त्या विकसित बुद्धिमत्तेचा राष्ट्रविकासासाठी उपयोग करुन घेण्याच्या उद्देश्याने २००७ -०८ या शैक्षणिक वर्षापासून केंद्र शासनाने NCERT मार्फत देशभर  NMMS या योजनेसाठी परीक्षा घेण्यास सुरुवात केली.दरवर्षी या परीक्षेस मिळणारा चांगला  प्रतिसाद हे या योजनेचं फलित आहे. दीड लाखाच्या आतील वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकाचा या परीक्षेत उत्तीर्ण होणारा पाल्य वार्षिक ₹ ६०००/- च्या शिष्यवृत्तीसाठी पाञ ठरतो.इयत्ता ७ वी मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे आठवीत शिक्षण  घेत असलेला विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी प्रविष्ट होतो.सदर परीक्षेचे प्रबोधन शहरी शाळेतल्या  तुलनेत ग्रामीण भागात अत्यल्प आहे,माञ त्याला वालूरची जि.प.शाळा अपवाद ठरावी,एवढी त्या शाळेत विविध परीक्षेविषयी विद्यार्थ्यांत जागृती आहे.वालूर कन्या शाळेचे मुख्याध्यापक अनंतकुमार देवळे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कोणतीही तडजोड केली नाही.

गुणवत्तेवर तालुक्याला मार्गदर्शक ठरतील असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेतील शिक्षकांच्या मदतीने शाळेत राबविले,विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार केलेल्या अध्यापनामुळे, शाळेचा बनविलेला निसर्गरम्य परिसर,बोलक्या भिंती अन् शालेय व्यवस्थापन समितीचा शाळेला असलेला भक्कम आधार या बाबींचा एकञित परिणाम म्हणून आज वालूर येथील जि.प.कें.प्रा.कन्या शाळेचा सेलू तालुक्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत वरचष्मा आहे.याचं ताजं उदाहरण म्हणून नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाकडे पाहता येईल. या शाळेतील वर्ग आठवीतील *पार्वती तळेकर,नेहा आबुज,प्रियंका खरबे,निकीता गडदे आणि शीतल भालेराव* या पाच विद्यार्थीनी एकाच वेळी सदर योजनेसाठी पाञ ठरल्या. शाळेचा नांवलौकीक वाढविल्याबद्दल उत्तीर्ण मुलींचे समाजाच्या सर्व थरातून कौतुक होत आहे.


ग्रामीण भागातील जि.प.शाळेची गुणवत्ता आता नजरेआड करता येणार नाही,असा सकारात्मक संदेश देणारी वालूरची जि.प.कें.प्रा.कन्या शाळा आणि तेथील सर्व शिक्षक जाहीर कौतुकास पाञ आहेत.


शाळा व्यवस्थापन समितीच्या  अध्यक्षाचा गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केला सत्कार


वालूर कन्या शाळेने मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्रप्रमुख अनंतकुमार देवळे,षडानन देशमाने,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय रामभाऊ पाथरकर यांचा सेलू तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी  मंगेश नरवाडे साहेब यांच्या हस्ते गटसाधन केंद्रातील कार्यालयात सत्कार करण्यात आला,यावेळी श्याम रुपनर,किरण राऊत,वसंत डासाळकर,मधुकर काष्टे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें