स्वा. सावरकर जयंती उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 27 मई 2018

स्वा. सावरकर जयंती उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन.

स्वा. सावरकर जयंती उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन.


भोकरदन (प्रतिनिधी)
शे.सलिम.
शहरातील स्वा. सावरकर प्रतिष्ठाण तर्फे उद्या दि.२८ सोमवार रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात येणार असून या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वा.सावरकर प्रतिष्ठाण तर्फे करण्यात आले आहे.
         भोकरदन येथील स्वा.सावरकर चौक , सराफा मार्केट येथे संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे राहणार आहे , तर प्रमुख उपस्थिती आ.संतोष दानवे, नगराध्यक्षा मंजुषाताई राजेंद्र देशमुख  असणार आहे.या जयंती उत्सव कार्यक्रमाला श्री भास्कर महाराज देशपांडे जाफराबाद , ह.भ.प.संतोष महाराज आढावणे  कुंभारी, ह.भ.प.माधव महाराज गिरणारे कोदोली यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नियोजन समितीकडून करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें