सेलु तालुक्यातील डिग्रस पौळ येथे भाजपच्या दोन गटात हाणामारी.
◆परस्परविरोधी गुन्हे दाखल.
समशेर खान.सेलु(प्रतिनिधि) :तालुक्यातील पौळ डिग्रस येथे दोन भारतीय जनता पार्टीचे गटामध्ये हाणामारी होवुन परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुन्या वादाचे कारण तसेच नवीन कामाचे वाद विकोपालाजावुन पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व माजी आमदार रामप्रसाद बार्डीकर गटाचे कार्यकर्ते आमने सामने येवुन त्याच्या वादाचे पुनर्वसन हाणमारीत झाले. महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे च्या रात्री 11 वाजेच्या सुमारास दोन्ही गटामध्ये हाणामारी होवुन दोन्ही गटाकडुन परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.माजी आमदार रामप्रसाद बार्डीकर गटाच्या विद्या अनिल पौळ यांच्या फिर्यादीवरुन आरोपी शिवाजी पौळ, प्रल्हाद पौळ, सतिष पौळ, पंकज निकम यांनी सुपर पावर फायनान्स कंपनीचे 17 हजार 300 रुपये परत देत नाही म्हणुन शिविगाळ करत मारहाण करुन मिरची पुड, काठ्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे विद्या पौळ यांच्या फिर्यादीवरुन भादवी कलम 452,327,323,143,147 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणाकर गटाचे शिवाजी एकनाथ पौळ यांच्या फिर्यादीवरुन आरोपी चक्रधर पौळ, अनिल पौळ व गुलाबराव पौळ यांनी जलयुक्त शिवार चे काम का घेतले तसेच मागील ग्राम पंचायत निवडणुकीचा राग मनात धरुन लोखंडी गजाने, काठीने मारहाण केली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असुन सदरिल आरोपीवर भादवी कलम 326,506,34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदरिल घटनेचा तपास पोलिस कर्मचारी एस. एस. शेलार हे करत आहेत

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें