अखेर जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या बदलीला स्थगिती= ना. लोणीकरांच्या प्रयत्नांना यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 4 मई 2018

अखेर जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या बदलीला स्थगिती= ना. लोणीकरांच्या प्रयत्नांना यश.

अखेर जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या बदलीला स्थगिती= ना. लोणीकरांच्या प्रयत्नांना यश.

ना. लोणीकरांनी केली जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांची बदली रद्द ; समाधान शिबिराच्या कामाची पावती.


समशेर खान.
परभणी /प्रतिनिधी
परभणी जिल्ह्याचे   कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची बदलीनाशिक येथे करण्यात आली होती पण या बदलीला आता स्थगिती देण्यात आली आहे.
परभणीचा खमक्या कलेक्टर अशी जनसामान्यांमध्ये ओळख निर्माण झालेले परभणीचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी परभणी येथे रुजू झाल्यापासून आपल्या कामाच्या शैलीने छाप पडली होती जनसामान्यांची कामे करण्यासाठी त्यांची धडपड त्यांच्यात दिसून येते त्यामुळे ते जनसामान्यात लोकप्रिय झाले होते मागील तीन महिन्याच्या काळात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. लोणीकर यांच्या संकल्पनेतील समाधान शिबीर यशस्वी करून जवळपास २ लाखापेक्षा जास्त लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात जिल्हाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली होती त्यामुळे त्यांच्या अचानकपणे झालेल्या बदलीने परभणीकर नाराज झाले होते.  परभणीतील सामान्य जनता तसेच काही सामाजिक संघटनांनी  ना. लोणीकर यांच्याकडे जिल्हाधिकारी यांची बदली रद्द करणेसाठी विनंती निवेदने दिले होते. सामान्य जनतेची लोकभावना लक्षात घेता तसेच  ना. लोणीकरही शिवशंकर यांच्या समाधान शिबिराच्या कामगिरीवर समाधानी असल्याने त्यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील  शिवशंकर यांच्या कडे बदलीस स्थगिती मिळविण्यासाठी मागणी करून प्रयत्न केले होते. मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत ना. लोणीकरांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन बदलीस स्थगितीसाठी विनंती  केली होती   ना. लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून शिवशंकर यांची नाशिक येथे झालेल्या बदलीस आता स्थगिती  मिळाली असून ते परभणीचे जिल्हाधिकारी म्हणूच काम बघणार आहे. जनसामान्यातून शासनाच्या या निर्ययाचे स्वागत केले असून परभणीकरांनी ना. लोणीकरांचे आभार व्यक्त केले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें