विनायकराव पाटील पाॅलीटेकनीक महाविद्यालय वैज्ञानिक उन्हाळी शिबीराचे आयोजन।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड शहरातील विनायकराव पाटील पाॅलीटेकनीक महाविद्यालयाने या उन्हाळ्यात विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या वैज्ञानिकाला चालना देण्यासाठी वैज्ञानिक उन्हाळी शिबीराचे आयोजन केलेले आहे या शिबीराची सुरूवात ७ मे पासून पाॅलीटेकनिक महाविद्यालयात
होत आहे या शिबिराचे आयोजन विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संज्ञा समजावून सांगण्यासाठी व प्रयोग शाळेतील साहित्य हाताळण्यासाठी याशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे।
येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा असणार आहे, त्या दृष्टीने तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी या शिबिरात रोबोटिक्स, एरो माॅडेलींग आणि ३डी प्रिंटर बद्दल माहिती व प्रशिक्षण मिळणार आहे.रोबोटीक्स मध्ये रोबोट्स कसे तयार केले जातात, ते काम कसे करतात या बद्दल ची माहिती व प्रशिक्षण, विमान कसे बनतात व ते काम कसे करते त्याच प्रमाणे ३ डी प्रिंटर पासून कशा व कोणत्या वस्तू बनतात या बद्दल ची माहिती व प्रशिक्षण विद्यार्थी विद्यार्थ्यांना मिळणार आहे।
मोबाईल व संगणकात खेळल्या जाणारे विविध गेम्स तयार करण्याचे प्रशिक्षण व एकदिवसीय आकाशगंगा निरीक्षण या कार्यक्रमांचा ही समावेश यात आहे तरी या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. किशोर पाटील यांनी केले आहे।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें