दादा - भाऊ सारे मिळून जेवू...!
शेतक-यांच्या " जलयुक्तचा " पाणवठा ' कोरडाच " ...?
सराटी (प्रतिनिधी) दि 05 (संतोष लहाने)सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना अंतर्गत सिमेंट बंधारा कामे सुरू करण्यात आले असुन हि कामे आटोपण्याची धांदल करीत अधिकारी - संबंधित काॅन्ट्रॅक्टर मार्फत कामे घाई गडबडीत निकृष्ठ दर्जाचेच करीत मोठ्या प्रमाणात जलयुक्त योजनांतर्गत आर्थिक मलिदा लाटण्यासाठी सर्वतोपरी साखळी पद्धतच अवलंबली जात असल्याचे चर्चेसमयी समोर येत आहे.
जलयुक्त शिवार योजनाअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून त्या कामांची आपल्या जवळीक कार्यकर्त्यांना कामाला लावले जात असुन राजकीय वरदहस्त अवलंबवून एकप्रकारे मलिदाच लाटण्यासाठी सर्वतोपरी धडपड येथील काही राजकीय मंडळींकडून सुरू आहे. " दादा - भाऊ आपण सारेच जण मिळून मिसळून जेऊ " अशाच प्रकारचे सुञ अवलंबवून जलयुक्त शिवार योजना अंतर्गत कामे करण्यात येत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळातूनच ऐकायलाही मिळत आहे.
या अगोदरही सिल्लोड तालुक्यातील गावा- गावात जलयुक्त शिवार योजनाअंतर्गत कामे करण्यात आली आहेत. अधिकारी - काॅन्ट्रॅक्टरांच्या मिलीभगतमुळे सदरील कामे ही निकृष्ठ दर्जाचेच करण्यात आल्याने सदरील गावांमधील नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावेच लागत आहे. सदरील कामांमध्ये महिनाभरही पावसाचे पाणी थबकत नसल्याचे अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांच्या तक्रारींद्वारे समोर येत आहे.
सिल्लोड तालुक्यातील सराटी,बोदवड,पानस,गोळेगाव,खंडाळा,आदिं गावात जलयुक्त शिवार योजना अंतर्गत कामे करण्यात येत आहेत पण या कामांवर संबंधित अधिकारी दुर्लक्षच करीत असल्याने तसेच आर्थिक मिलीभगतमुळे सदरील कामे निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत आहे.
सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना अंतर्गत सिमेंट बंधारा कामे करण्याचा सपाटा सुरू असला तरी " दादा - भाऊ आपण सारेच जण मिळून जेऊ " हेच सुञ अवलंबवल्या जात असल्याने बागायती क्षेत्रात वाढ तर झालीच नाही असे म्हणायला हरकत नाही,सिल्लोड तालुक्यातील जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचारीच्या विळख्यातच सापडल्याने शेतक-यांसाठी गरजेच्या या योजनेचा पाणवठा माञ कोरडाच राहत असुन राजकीय वरदहस्त असलेल्या राजकीय मंडळींची जलयुक्तच्या माध्यमातून एकप्रकारे आर्थिक चांदीच होत आहे एवढे माञ खरे....!

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें