मुजोर मुख्‍याधिकार्यास दाखवा नोटीस. नगर परिषदेच्या चालू असलेल्या चार चौकशांच्या अहवाल न दिल्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 7 मई 2018

मुजोर मुख्‍याधिकार्यास दाखवा नोटीस. नगर परिषदेच्या चालू असलेल्या चार चौकशांच्या अहवाल न दिल्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा.

मुजोर मुख्‍याधिकार्यास  दाखवा नोटीस.                नगर परिषदेच्या चालू असलेल्या चार चौकशांच्या अहवाल न दिल्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा.


सेलू प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांपासून नगरपरिषद सेलूच्या चालू असलेल्या चार विविध चौकशी प्रकरणाचा अहवाल न दिल्यामुळे तसेच सहाय्यक जिल्हा अधिकारी सेलू यांनी अनेक वेळा स्मरण पत्र देऊन देखील अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकरणाचा अवहाल न देता तसेच चौकशीला सामोरे न जाता मंत्रालयातून चालू असलेल्या चौकशीला देखील मुख्याधिकारी नगर परिषद सेलू हे टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी  यांनी देविदास जाधव मुख्याधिकारी सेलू यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस देऊन आपल्याविरुद्ध जिल्हा अधिकारी यांच्याकडे शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे नमूद पत्रात उल्लेख केलेला आहे
            याबाबतचे सविस्तर वृत्त असे की सेलू नगरपरिषदेच्या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी येत आहेत त्यानुसार सेलू नगर परिषदेच्या 45 मालमत्ता परस्पर विक्री केल्याप्रकरणी आपले सरकार तथा मंत्रालयातून नगर विकास विभाग मंत्रालयातून याबाबत किमान पाच पत्र दिलेली आहेत तसेच सेलू नगरपरिषदेच्या मोकळ्या जागा नगरसेवक तथा त्यांच्या संबंधितांनी हडप केलेल्या प्रकरणासंदर्भात शिवाय सर्वेनंबर 232 च्या अकृषिक प्रकरणात मोकळ्या जागेवर देखील अनाधिकृतपणे भूखंड पाडल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी मूळ जमीन मालक यांचे विरुद्ध एमआरटीपी कायदा 52 नुसार कार्यवाही करणे नूतन महाविद्यालयासमोरील आयडिया कंपनीच्या टॉवर प्रकरणात देखील वारंवार जिल्हाअधिकारी परभणी तसेच मंत्रालयातून अनेक वेळा स्मरणपत्रे देऊन देखील मुख्याधिकारी सेलू हे याबाबतचा अहवाल तथा कार्यवाही करण्यास टाळाटाळ करत आहेत तसेच सहाय्यक जिल्हा अधिकारी यांच्याकडे या सर्वच प्रकरणात चौकशी चालू असताना देखील चौकशी हजर  न राहणे आदी कारणामुळे मुख्याधिकारी सेलू यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबत बाबतची अंतिम कारणे दाखवा नोटीस सहाय्यक जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांनी देविदास जाधव मुख्याधिकारी नगर परिषद सेलू यांच्या नावे पत्र दिलेले आहे मात्र अद्यापही मुजोर मुख्याधिकारी उर्वरित सर्वच प्रकरणात अहवाल देण्याचे टाळत आहेत यामुळे संबंधितावर काय कारवाई होते याकडे सेलू वासियांचे लक्ष लागलेले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें