डाॅ. संजय रोडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 7 मई 2018

डाॅ. संजय रोडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.

डाॅ. संजय रोडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. डाॅ. संजय रोडगे यांच्या वाढदिवसानिमीत्त मागील वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या महिलांना स्वयंरोजगाराचे साधन म्हणून शिलाई मशीनचे वाटप करण्यात आली होती. या वर्षी डाॅ. संजय रोडगे यांच्या नविन संकल्पनेतून आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या मुलींना ज्ञानतीर्थ विद्यालयामध्ये दहावी पर्यंतचे व त्यानंतरचे शिक्षण अपूर्वा पाॅलिटेक्नीकमध्ये देण्याचा संकल्प केला आहे या विद्यार्थ्यांच्या सर्व शिक्षणाचा खर्च हा प्रिन्स अकॅडमीमधील विद्यार्थ्यांच्या फिसमधील 5% वाटा हा या मुलांवर करण्यात येईल. तसेच एका बाजूने पाहता सधन घरातील मुले ही सुद्रढ असतात परंतु समाजाची दुसरी बाजू जी परिस्थितीने बिकट आहे आशा घरातील मुले ज्यांना दोन वेळचे जेवण मिळणे हालाखिचे होते अशा वेळेस बालक कुपोषित  जन्माला येते. आशा कुपोषित बालकांना सदृढ बालकाप्रमानेच वाढ होण्यासाठी लागणारे प्रोटिन किंवा वैद्यकीय तपासणी करून त्यावर योग्य ते उपचार करण्याचे काम क्युरीयस किड्स किन्डरगार्टन च्या विद्यार्थ्यांच्या फिसमधील 5% वाटा हा या मुलांवर खर्च करण्यात येईल असे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा डाॅ संजय रोडगे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
    तसेच सेलू उपजिल्हा रुग्णालयात फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रिन्स अकॅडमी येथे सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये 50 बालक सहभागी झाले होते. 0ते 2,  3 ते 4 व 5 ते 6 या वयोगटामध्ये  स्पर्धा घेण्यात आली होती.  0 ते 2  या गटातून प्रथम देवांश सोनी, द्वितीय उत्कर्ष घायतड, तृतीय रूई बोकन 3ते4 या वयोगटामध्ये प्रथम स्वरा टाके, द्वितीय जान्हवी खिल्लारे व तृतीय देवांश मोरे, 5ते6 या वयोगटामध्ये प्रथम श्रेया भुतडा, प्रांजल घुगे, तृतीय कौस्तुभ शेळके यांनी क्रमांक पटकावले.  वाढदिवसानिमीत्ताने रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले होते यामध्ये 50 कर्मचारी यांनी रक्तदान केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें