सेलू वालूर रस्त्याची दुर्दशा; अर्धा रस्ताच खड्डेमय. रस्त्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी विरोधक दोघंही गप्पच. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 15 मई 2018

सेलू वालूर रस्त्याची दुर्दशा; अर्धा रस्ताच खड्डेमय. रस्त्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी विरोधक दोघंही गप्पच.

सेलू वालूर रस्त्याची दुर्दशा;  अर्धा  रस्ताच खड्डेमय.

रस्त्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी विरोधक दोघंही गप्पच.



सेलु. प्रतिनिधी.
समशेर खान.
तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वालुर येथे जाणारा मुख्य रस्त्याची चांगलीच दुर्दशा झाली असून एकूण 12 किमी रस्त्यापैकी जवळपास अर्धा रस्ता खराब झाला आहे वालुर येथे येणाऱ्या चारही रस्त्याची अवस्था जवळपास सारखीच आहे एकीकडे राज्याच्या बहुतेक ठिकाणी मजबुत आणि टिकावु रस्त्याची कामे चालू असताना वालुर मध्ये एकाही रस्त्याची काम सुरू नसल्याने या गावच्या रस्त्याची भाग्य उजळून येथील रस्त्याला अच्छे दिन कधी येणार या प्रतीक्षेत वाहनधारक व परिसरातील नागरिक आहेत वालुर येथे जाण्यासाठी सेलू -वालुर ,मानवतरोड -वालूर -बोरी ,वालूर -चारठाणा ,वालूर या रस्त्याशिवाय वालुर- निवळी -जिंतूर -वालुर -मोरेगाव वालुर- राव्हा  -जिंतूर हे रस्ते आहेत ही सर्वच रस्ते 10 ते 20 किमी अंतराची आहेत यापैकी एकाही रस्ता धड नाही असेच म्हणावे लागते तालुक्याचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे व वालुर जि प सर्कलचे सदस्य राजेंद्र लहाने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तर भाजपाचे तालुका अध्यक्ष तथा माजी जि प सदस्य संजय साडेगावकर यांचे राजकीय दरबारात फारसे वजन नसल्याचा हा परिणाम आहे की अन्य कारण आहे परंतु रस्त्याची मात्र सर्वच दुर्दशा आहे सेलू वालुर या 12 किमी रस्त्यांपैकी जवळपास सहा किमी रस्त्यावर एवढे खड्डे आहेत त्यामुळे कोणतेच वाहन धड चालविता येत नाही असे असले तरी रस्त्याच्या या प्रश्नावर लोकप्रतिनिधी आणि विरोधक असे दोघेही गप्पच आहेत



 होल्डिंग काढले टाकून


 सेलू परभणी रस्त्याला जोडल्या जाणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ मध्यंतरी एक होल्डिंग राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने लावण्यात आले होते पण ते रस्ता होण्यापूर्वीच काढून टाकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे जलशुद्धीकरण प्रकल्पा पासून वालुर  निवळी पाचलेगाव मार्गे जिंतुर असा दुपदरी रस्ता होणार म्हणून लावलेली होल्डिंग रस्ता होण्यापूर्वीच काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे रस्त्याच्या कामा पूर्वीच होल्डिंग लावणार्‍यांनी केलेल्या घाईने त्यांचे हसे होत असल्याने हे होल्डिंग काढण्यात आल्याचे परिसरातील वाहनधारक म्हणतात

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें