चीनच्या परिषदेत डॉ.भिसे सहभागी होणार कोल्हा वाडी येथील ग्रामस्थांनी केले कौतुक.
सेलू प्रतिनिधी.
समशेर खान.
मूळचे परभणी जिल्ह्यातील कोल्हा वाडीचे व सध्या नवी मुंबईच्या एस आय ए एस तंत्रज्ञान महाविद्यालय इंग्रजीचे अध्यापन करणारे डॉ रामकिशन बाबूराव भिसे हे बीजिंग (चीन) येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान वास्तुसंग्रहालयात 17 मे ते 25 मे दरम्यान आयोजित आशिया पॅसिफिक सायन्स फिक्शन परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
भारतीय मराठी विज्ञान साहित्य या विषयावर ते परिषदेत शोधनिबंध सादर करतील या परिषदेतील दोन चर्चासत्रही आहे त्यांचा सहभाग राहणार आहे भारतीय विज्ञान साहित्यातील जयंत नारळीकर यांचे योगदान या विषयावर डॉक्टर भिसे यांनी पीएचडीसाठी जळगाव विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला आहे या परिषदेसाठी देशातून दोन तज्ञ अभ्यासकांची निवड केली आहे यामध्ये बंगळूरच्या डॉक्टर श्री नरहरी यांचा समावेश आहे अपेक चिन व्यवसाय परिषदेच्या सहकार्याने आणि चीन विज्ञान-तंत्रज्ञान वस्तुसंग्रहालय आणि गुओ युए सांस्कृतिक व निर्मितीक्षम कंपनी लिमिटेड आणि जागतिक नवोपक्रम देश परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने परिषद आयोजित केली आहे जगातून आलेले तज्ज्ञ व या परिषदेसाठी वैज्ञानिक साहित्यावरील विचार मंथन करणार आहेत त्यामुळे डॉ रामकिशन भिसे यांचे संपूर्ण परभणी जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे त्यामुळे परभणी जिल्हा कथा महाराष्ट्रातून डॉ रामकिशन भिसे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.तसेच कोल्हावाडी येथील सरपंच अँड विठ्ठल भिसे ,सौ अश्विनी भिसे (उप सरपंच),साळीकर गिरी (सदस्य),मनोज भिसे (सदस्य ),प्रा मधुकरराव भिसे(ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी),प्रा रामचंद्र भिसे (भोकर),बाळासाहेब यादव (जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्टीय शिक्षक परिषद),बाळासाहेब भिसे सर ,दिगंबर भिसे सर,तुकाराम धोपटे सर ,मुळे सर (जि प कोल्हावाडी)
काळे सर (जि प कोल्हावाडी),शंकर भिसे सर,नारायणराव भिसे (मा सभापती पं स मानवत)
उद्धवराव भिसे (मा सरपंच कोल्हा),गोपाळराव भिसे,
कृष्णा भिसे (तलाठी),कृष्णा भिसे (मुंबई पोलीस)
सचिन भिसे ,लखन भिसे ,हनुमान भिसे ,माधव भिसे
संजय भिसे इत्यादींनी डॉ भिसे यांचे कौतुक केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें