वीर माहेश्वर बाल संस्कार शिबीर व विध्यार्थी गुणगौरव सोहळा.
श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे विर माहेश्वर संस्कार शिबीराचा समारोप.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२९मे २०१८
सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी चौथे वीर माहेश्वर बाल संस्कार शिबीरार्थी प्रमाण-पत्र वितरण व विध्यार्थी गुणगौरव सोहळ्या निमित्त दि.३० मे २०१८ बुधवार रोजी ठिक दुपारी ठीक २ वा. श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात श्री.ष.ब्र.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर , श्री.ष.ब्र.अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर , श्री.ष.ब्र.काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथ्रीकर आदींच्या उपस्थितीत व प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.पी.शिवा शंकरजी जिल्हाधिकारी परभणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.राजेश्वररावजी देशमुख सचिव श्री वैद्यनाथ देवस्थान परळी-वै. प्रमुख उपस्थिती सी.एस.कोकणी उपजिल्हाधिकारी पाथरी, जीवराज डापकर तहसीलदार सोनपेठ, डॉ.तानाजी भोसले पशु वैद्यकीय अधिकारी सोनपेठ, सोपान शिरसाट पोलीस निरीक्षक सोनपेठ, गिरीश दापकेकर मुख्याधिकारी न.प.सोनपेठ, बाबूरावजी मेनकुदळे विश्वस्त श्री वैद्यनाथ देवस्थान परळी-वै. आदी मान्यवरांच्या ऊपस्थितीत शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण व गुणवंत विध्यार्थी गुणगौरव करण्यात येणार आहे.
या समारंभास वीरशैव समाज बांधव तसेच शिक्षण प्रेमी नागरिकांनी कार्यक्रमास हजेरी देवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समस्थ श्री नंदिकेश्वर मठ संस्थान भक्त व शिष्य गणांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें