कन्नड पिक कर्ज तसेच मुद्रा लोन संदर्भात येणार्या अडचणी निरसन करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न।
कन्नड प्रतिनिधी:-शेख शहेबाज।
कन्नड शहरा मध्ये पीक कर्ज तसेच मुद्रा लोन या अतिशय ज्वलंत विषयावर कन्नड सोयगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री हर्षवर्धन जाधव यांनी लीड बैंक मॅनेजर प्रदीप कुटवाल यांच्या नेतृत्वात कन्नड सोयगांव मतदार संघातील सर्व राष्ट्रीय तसेच सहकारी बँक याचे प्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली।
या बैठकीस विनाअट जे पात्र आहे त्यांना त्वरित पीक कर्ज देण्यात यावे तसेच मुद्रा लोनच्या १०० / केसेस देखील मार्गी लावण्यात यावे अशी मागणी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली।
व जर मुद्रा लोनच्या केसेस लवकरात लवकर मार्गी नाही लावल्यात तर औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगीतले उपस्थित मुद्रा बँक प्रतिनिधि यांनी त्वरित मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन बँक प्रतिनिधींनी बैठकीत दिले।
यावेळी उपस्थित कन्नड कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र मगर, पंचायत समिती सदस्य किशोर पवार, नगरसेवक संतोष भाऊ, प्रदीप बोडखे, सागर महाले आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें