ग्रामपंचायतने दिला अपंगांना संपूर्ण 3% निधी फारोळा हे जिल्ह्यातले पहिले गाव.
समशेर खान.औरंगाबाद- सन 1995 च्या अपंग पुनर्वसन कायद्यानुसार ग्रामपंचायतकडे जमा होणाऱ्या विविध स्वनिधीतला 3% निधी हा अपंगांसाठी राखीव ठेवला पाहीजे.
सन 2011 च्या अपंग कृती आराखडया नुसार हा 3% निधी अपंग कल्याण व पुनर्वसनासाठी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु ग्रामसेवक व सरपंचाच्या उदासिनते मुळे हा निधी राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतने अपंगांसाठी वापरला नाही. अपंगांच्या या चांगल्या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे प्रहारचे अध्यक्ष आ बच्चु कडू यांच्या लक्षात आले.
आ बच्चु कडू यांनी अपंगांच्या 3% निधीसाठी गल्ली पासून ते मंत्रालया पर्यंत आंदोलन उभारले. मुख्यमंत्री व मंत्र्यासह अधिकार्यांच्या ही बाब लक्षात आणून देताच या योजणेला गती मिळाली.
निधी खर्च करताना भ्रष्टाचार होऊ नये म्हणून हा निधी रोख स्वरूपात अपंगांच्या खात्यात जमा करण्याचा दि 28 ऑक्टोबर 2015 चा नगरविकास व 28 एप्रिल 2016 चा ग्रामविकास विभागाकडुन शासननिर्णय काढून घेतला.
या शासननिर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने प्रहार अपंग संघटना औरंगाबाद तर्फे औरंगाबाद जिल्हा परिषदेवर *झोपा काढो* आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने प्रशासन जागे झाले होते पण कामाला लागले नसल्याने पुन्हा प्रहार तर्फे क्रांती चौक ते जिल्हा परिषद *अपंगांचा अर्धनग्ण आक्रोश मोर्चा* नुकताच एप्रिल महिन्यात काढण्यात आला. शेवटी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतला सन 2011/12 पासून ते सन 2018 पर्यंतचा सर्व 3% निधी अपंगांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले.
या आदेशाची अंमलबजावणी पैठण तालुक्यातील फारोळा या गावाने सर्वप्रथम केली.
गावातील 19 अपंगांना प्रत्येकी 7691 चे धनादेश सन 2011/12 पासून ते सन 2018 चा पूर्ण निधी प्रहारचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच लतिफ पठाण ,ग्रामसेवक वाघ साहेब , उपसरपंच श्रीधर धरपळे, महिला जिल्हा अध्यक्ष सुनिता खरात, तालुका अध्यक्ष बाबासाहेब पठाडे सह गावातील अपंग , ग्रामपंचायत सदस्यासह गावकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजण कडुभाई यांनी केले होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें