भुजबळांना बाहेर काढणं हे भाजपचं राजकारण - राज ठाकरे.

वि.प्रतिनिधी.(समशेर खान)
छगन भुजबळ यांना बाहेर काढणे हे भाजपचे राजकारण आहे. पण, भाजपलाही एक्सपायरी डेट आहे आणि जनतेला हे कळते, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भुजबळांच्या जामिनावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पाच लाखांच्या जात मुचलक्यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयानं शुक्रवारी जामीन मंजूर केलाय. यामुळे, तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत.राज ठाकरेंची टीका...
यानंतर, सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता त्यानी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. 'भुजबळांवर करण्यात आलेल्या आरोपांवर चौकशीनंतर शिक्षा होईल... जामीन देण्यासाठी सरकारने उशीर लावला... कोर्टाने सांगितल्या नंतरही भाजपअसं राजकारण करत असेल तर हे चुकीचंच आहे... भाजपच्या फायद्यासाठी सरकार त्यांना बाहेर काढणार असतील तर हे लोकांनाही कळतं...पण, भाजपलाही एक्सपायरी डेट आहे' असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यातील भाजप सरकारवर टीका केलीय.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें