सेलू उद्यानातील झाडांची कत्तल आदर्श नगरातील प्रकार पालिका प्रशासन अनभिज्ञ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 10 मई 2018

सेलू उद्यानातील झाडांची कत्तल आदर्श नगरातील प्रकार पालिका प्रशासन अनभिज्ञ.

सेलू उद्यानातील झाडांची कत्तल आदर्श नगरातील प्रकार पालिका प्रशासन अनभिज्ञ.

आदर्श नगर येथील उद्यानामुळे पालिकेला मिळाले होते दोन पुरस्कार.


सेलू प्रतिनिधी
समशेर खान.
येथील आदर्श नगरातील उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा नावाखाली काही लाकूड तस्करांनी पालिका अधिकार्‍यांशी हातमिळवणी करत उद्यानातील सुमारे पंचवीस वर्षे जुने असलेले वृक्ष तोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे दरम्यान गुरुवारी उद्यानातील एका जुनाट वृक्ष तोडल्यानंतर काही जागृत नागरिकांनी जाब विचारल्यानंतर लाकूड तस्करांनी पळ काढला तर पालिका प्रशासनाने याबाबत काहीच माहिती नसल्याचा आव आणला पण एवढ्या वेळात एका पंचवीस वर्षाच्या जुनाट गुलमोहराच्या वृक्षांचा बळी गेला आदर्श नगरातील अनेक वर्षापासून एक उद्यान आहे अनेक वर्षे हे उद्यान शहरवासीयांच्या आकर्षण ठरत होते मात्र मध्यंतरी या उद्यानाकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने उद्यानातील रंगीबेरंगी फुले झाडे लिली फुलांची झाडे खेळणी साहित्य आसनव्यवस्था गायब झाली कालांतराने हे उद्यान झाली नसल्याने भकास झाले परंतु उद्यान विकसित करताना उद्यानाच्या चहूबाजूने करंजी गुलमोहर निलगिरी आदी वृक्ष लावण्यात आले होते त्यामुळे हे उद्यान चहूबाजूने वृक्षाच्या दाट छायेत होते परंतु पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्यानातील जवळपास पंचवीस वर्ष पेक्षा जुनी अधिक वयाची वृक्ष तोडण्यात आली व उद्यानाची शोभा कमी करण्याचा प्रयत्न सेलू नगरपालिकेने केला असून आता या उद्यानात व्यापारांसाठी ट्रॅक आणि खुली व्यायाम शाळा करण्यासाठी पालिकेने निधी मंजूर करून कामाचे भूमिपूजन केले आहे परंतु हे काम करण्याच्या नावाखाली उद्यानाची संरक्षण भिंतीचा आतील वृक्ष तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे उद्यानातील एक वृक्ष रस्त्याच्या लगत झुकल्याने एका नागरिकाने झुकलेला वृक्ष धोकादायक बनल्यामुळे काढून घेण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला होता त्यानंतर काही दिवस महिन्यांनी झुकलेली फांदी काढण्याऐवजी मुळातूनच वृक्ष तोडण्यात आले त्या अर्जाचं नावाखाली पुन्हा गुरुवारी एका गुलमोहराचे एक वृक्ष मशिनच्या साह्याने तोडले वेळी नजीकच्या प्रभागातील नागरिकांनी उद्यानाकडे धाव घेतल्यानंतर त्याच्या लगत असलेल्या काही वृक्ष मात्र यावेळी वाचले दरम्यान याबाबत मुख्याधिकारी देविदास जाधव यांना विचारले असता मला हा घडलेला प्रकार काहीच माहित नाही मी या प्रकाराची माहिती घेऊन तुम्हांस कळतो अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन जाधव यांनी आदर्श नगर मधील उद्यानाबद्दल काहीच माहीत नसल्याचा कांगावा मात्र केला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें