परळी वैजनाथ येथे सर्वधर्मीय विवाह सोहळा संपन्न. ४० जोडपे झाले विवाहबद्ध. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 10 मई 2018

परळी वैजनाथ येथे सर्वधर्मीय विवाह सोहळा संपन्न. ४० जोडपे झाले विवाहबद्ध.

परळी वैजनाथ येथे सर्वधर्मीय विवाह सोहळा संपन्न.

४० जोडपे झाले विवाहबद्ध.


सोनपेठ/परळी (राजेश खेडकर) दि.१०मे २०१८
बीड जिल्हा धर्मादाय संस्था आणि वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे नुकताच थाटामाटात पार पडला. यात सकाळच्या सत्रात मुस्लिम समाजातील ५ जोडप्यांचे निकाह, तर सायंकाळी ५ वाजता १८ जोडप्यांचा बौद्ध धर्मीय पद्धतीनं मंगल परिणय व तद्नंतर हिंदू धर्मपद्धतीने १७ जोडप्यांच्या भव्य विवाह सोहळा वैद्यनाथ मंदिराच्या उत्तर घाटावर अतिशय थाटामाटात संपन्न झाला.
दि.८मे रोजी संपन्न झालेल्या ह्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्या प्रसंगी नववधू-वरांना अशिर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रसंत भैय्युजी महाराज, श्री श्री श्री १०८ श्रीगुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर, श्रीमती प्रज्ञाताई गोपीनाथराव मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, प्रा.टी. पी.मुंडे, बबनभाऊ गित्ते, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, धर्मादाय मुख्यायुक्त शिवकुमार दिघे, धम्मानंद मुंडे, पी.एस.घाडगे, नगराध्यक्षा सौ.सरोजिनिताई हलगे यांच्यासह शेकडो मान्यवर व हजारो वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते.
सायंकाळी संपन्न झालेले बौद्ध व हिंदू धर्मपद्धतीतील विवाह लख्ख प्रकाश झोतात संपन्न झाले. शेवटच्या मंगलाष्टकानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. संयोजन समितीतील शेकडो सदस्यांनी आलेल्या हजारो वऱ्हाडी मंडळींची व्यवस्था सांभाळली. आजच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या नव वधू-वरांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. सर्वात शेवटी सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष राजेश देशमुख यांच्यासह सर्वांनी धर्मादाय आयुक्त शिवकुमार दिघे यांचा सत्कार केला.
सुमारे चाळीस विवाह या विवाह सोहळयात संपन्न झाले. या विवाह सोहळयाला परळीकरांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. श्रीमती प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्याकडून विवाह सोहळयात सहभागी झालेल्या नव वधु-वरांना कपडे देण्यात आली आहेत. त्यात वधुसाठी साडी-चोळी व नवरदेवासाठी पोशाखाचा समावेश आहे. उषाताई किरणकुमार गित्ते यांच्यावतीने मणी-मंगळसूत्र, चाँदपत्र दिले गेले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावतीने वधु-वरांसाठी कपाट व वधुसाठी दोन साड्या, अंबाजोगाई येथील मानवलोकच्या वतीने पलंग व गादी दिली गेली आहे. तर वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा विवाह सोहळयाचा संपूर्ण खर्च करण्यात आला. तर संयोजन समितीच्या वतीने वधु-वरांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. विवाह सोहळयातील पात्र लाभार्थींना कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर गॅस कनेक्शनही दिले जाणार आहे. विवाह सोहळयासाठी अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवस्थान ट्रस्टने दहा लाख रूपयांची देणगी दिली आहे तर जिल्हाभरातील विविध संस्थांनीही सढळ हाताने मदत केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें