चारठाणा येथिल पाणी फाउंडेशनचि कामे करण्यावरुनही ग्रा.प.मध्ये बाचाबाची.
रमजान ईद नंतर उपसरपंच बदलाचा महुर्त निश्चित.
वाटरकप स्पर्धेबाबत नागरिकांतुन चर्चेला उध्दान.
उपसरपंच पदासाठी आनेकांचे गुडघ्याला बाशिंग.
चारठाणा ( प्रभाकर कुर्हे )चारठाणा येथिल पाणी फाउंडेशनचि कामे करण्यावरुनही ग्रा.प.उपसरपंच व ग्रा.प सदस्यात बाचाबाची होउन प्रकरण मारामारि पर्यंत गेले सदर माहिती आमदार मोहदयांपर्यंत पोहचल्याने रमजान ईद नंतर उपसरपंच बदलाचा महुर्त निश्चित झाल्याचे कळते परंतु वाटरकप स्पर्धेबाबत नागरिकांतुन चर्चेला उध्दान आले आसुन दुसरिकडेउपसरपंच पदासाठी आनेकांचे गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
बाबत आधिक माहिती आशी की,चारठाणा गावाचा वाटरकप स्पर्धेसाठी निवड झाली आणी संपुर्ण गावासह परिसरही चारठाणकरांच्या मदतिला धाऊन आपापल्या परिने श्रमदान केले या मध्ये काहि सामाजिक संस्थांसह ,शेतकर्यांनि हातभार लावत कामे सुरु होती परंतु सामाजिक कार्याचे काहिही देणेघेणे नसलेली मंडळी कोठे काय मिळते याच्याच शोधात होते या मध्ये स्पर्धेचा काळ संपला आणी कोठे ,किती ,कशे,किती क्षमतेचे काम झाले या सर्व ताळेबंद करत आसतांना विविध आनेक कारणे पुढे करत ग्रा.प सदस्य ,उपसरपंच यामध्ये बाचाबाची सुरु झालि प्रकरण मारामारिपर्यंत पोहचले परंतु वेळिच काही महिलांनी मध्यस्ती करत मिटवा मिटवि केली सदर बाब नानासाहेब राउत,आमदार विजय भांबळे यांना कळताच बैठक बोलाउन रमजान ईद नंतर उपसरपंच पदात बदल करण्याचे ठरल्याचे खात्रीलायक व्रुत्त आहे येथिल पाणी फाउंडेशनचि कामे करण्यावरुनही ग्रा.प.उपसरपंच व ग्रा.प सदस्यात बाचाबाची होउन प्रकरण मारामारि पर्यंत गेले हि बातमी नागरिकांपर्यंत पोहचताच सदर स्पर्धेबाबत नागरिकांतुन चर्चेला उध्दान आले आसुन दुसरिकडे उपसरपंच पदासाठी आनेकांचे गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें