गुरुलिंगअप्पा विश्वनाथअप्पा मोडीवाले यांचे निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 30 मई 2018

गुरुलिंगअप्पा विश्वनाथअप्पा मोडीवाले यांचे निधन.

गुरुलिंगअप्पा विश्वनाथअप्पा मोडीवाले यांचे निधन.

सोनपेठ (राजेश खेडकर) दि.३०मे २०१८
सोनपेठ तालूक्यातील मौ.डिघोळ (दे.) येथील वयाची शंभरी पार केलेले  गुरूलिंगअप्पा विश्वनाथअप्पा मोडीवाले यांचे आज दि.३० मे २०१८ बुधवार रोजी डिघोळ (दे.) येथील राहत्या घरी दिर्घ आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय १०२ वर्ष होते.
गुरूलिंगअप्पा यांनी बीड जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीसांत जमादार ह्या पदावर सेवा बजावली होती. परंतू कांही घरगुती कारनास्तव त्यांना काही काळानंतर पोलीसातील नोकरी सोडावी लागली होती. नोकरी सोडल्यानंतर ते डिघोळ येथेच कायम वास्तव्यास होते. सरळ व सुस्वभावी म्हणून परिचीत असलेल्या गुरूलिंगअप्पा यांनी आरोग्याच्या बाबतीत नेहमीच सतर्कता बाळगली होती; तसेच त्यांनी जीवनाच्या शेवट पर्यंत दात घासन्यासाठी कायम लिंबाच्या काडीचाच वापर केला होता. यांच्या पश्चात मनोह, अशोक, देविदास, शिवहर व मधुकर ही पाच मुले, दोन मुली, नातवंड, पतवंड असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर आज (दि.३०मे २०१८ बुधवार रोजी) दुपारी १२ वाजता डिघोळ येथेच अंतिम संस्कार करण्यात येनार असल्याचे कळविण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें