कौसडी येथील डी पी जळाल्याने विद्युत पुरवठा खंडीत.
कौसडी प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील विज पुरवठा करणारी डी पी जळाल्याने आर्ध्या गावात विज पुरवठा खंडीत झाली आसुन गावक-यांना आजुन कीती दीवस अंधारात राहावे लागनार आहे याचा काही नेम नाही
सध्या मुस्लिम बांधवाचा रमजान महीना सुरू आसुन तापमानात वाढ झाल्याने रोजा ठेवणारे मुस्लिम बांधव उष्णतेने बचाव करण्यासाठी कुलर पंखे चा सहारा घेत आहे व या रमजान महीण्यात महावितरण कंपनी कडुन 24 तास लाईट सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहे मात्र या कान्हड 33 के व्ही वर्ष दहा-दहा मींनटाला विजपुरवाठा खंडीत करण्यात येत आहे या मुळे मुस्लिम बांधवासह गावातील नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे
महावितरण कंपनीचा गलथान कारभार व कर्मचा-यांची अपुर्तेमुळे गावातील नागरिक नाहक्क त्रास सहन करत आहे मागील काही दिवसा पुर्वीच हे डी पी तिन ते चार वेळेस जाळेले होते तेव्हापन गावक-यांनी वर्गणी गोळा करून डी पी आणुन बसवीले होते कौसडी या गावात लोकसंख्या पंधरा हजार आसुन एकच लाईनमन उपलब्ध आहे विद्युत पुरवठेचा कामाचा भार फक्त एकाच लाईनमनवर आसुन गावातील डी पी वर वरंवार बिघाड होत आहे गावात जागोजागी विद्युत तारे लोबंलेली आसुन डी पी पुर्णपने उघडी आसल्याने लाहान मुलांच्या व नागरीकांच्या जिवीताला धोका होण्याची शक्याता नाकारता येत नाही
या सा-या बाबीची दखल महावितरण कंपनी च्या वरीष्ठ अधिका-यांन घेत लवकरात लवकर जाळालेले डी पी बसुन गावातील नागरिकांच्या घरावरील लोबलेली विद्युत तारे टाईट करून घ्यावेत आसे गावक-यातुन मागणी होते आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें