बळकटीकरण व अबंधीत निधी मिळालाच नाही.येलदरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील परीचारिकेची तक्रार.
जिंतूर / प्रतिनिधी
तालुक्यातील येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत चालणाऱ्या उप केंद्राना चालू आर्थिक वर्षातील बळकटीकरण, व अबंधीत नदी मिळाला नसून या मुळे आम्हाला उप केंद्र चालवायला अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार सहा परीचारिकांनी जिल्हा आरोग्य अधिकार्या कडे केली आहे या बाबत चौकशी करून दोषी वैधकीय अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे
या बाबत अधिक वर्त असे की तालुक्यातील येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत परिसरात आठ आरोग्य उप केंद्र चालतात या उप केंद्रात येणाऱ्या रुग्णांना सुविधा मिळाव्यात उप केंद्रात नेहमी स्वच्छता राहावी म्हणून या उपकेंद्राना बळकटीकरण व अबंधीत निधी म्हणून दरवर्षी 18 हजार ते 20 हजार रुपायापर्यंत निधी शासनातर्फे देण्यात येतो सण 2017 ते 2018 मध्ये बळकटीकरण व अबंधीत निधी येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ अन्सारी यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यल्या मार्फत जानेवरी 2018 मध्ये मिळूनही तो निधी त्यांनी अद्याप पर्यन्त संबंधित उप केंद्राना वितरित न केल्यामुळे या आठही उप केंद्रातील कार्यरत परीचारिकाना अनेक गौरसोयीचा सामना करावा लागत आहे उपकेंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुगणाची तपासणी करण्यासाठी हिमोग्लोबिन मिटर, रक्तदाब तपासणी यंत्र,बसण्यासाठी खुर्च्या, गरोदर माताच्या तपासणी साठी वजन यंत्र,स्टेशनरी,तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडू,खराटे आदी नसल्यामुळे उप केंद्रात व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून वैधकीय अधिकाऱयांनि हा निधी लवकरात लवकर द्यावा अशी मागणी आठ उप केंद्रापैकी सहा उपकेंदारातील परीचारिकांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे या निवेदणावर पि.पि.मते (बामणी), बिरारी एस वाय (भोसी), दुभळकर के एस (सावंगी म्हाळसा),लाटे एस ए (पिंपळगाव), हिवाळे टी एस (येलदरी),घुगरे के आर (आंबरवाडी/ केहाळ) या परीचारिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत
चौकशी करू :- बोराळकर या सर्व प्रकरणा बाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश बोराळकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा निधी त्यांच्या तालुका कार्यल्या मार्फत जानेवारी 2018 मध्येच येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील उप केद्राना पाठवण्या साठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला असुन तो जर संबंधित उप केंद्राना मिळाला नसल्यास आपण याची चौकशी करू असे पुण्य नगरीशी बोलताना सांगितले.
निधी मिळाला पण वाटप नाही केला :- डॉ अन्सारी या बाबत येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधीक्षक डॉ तौसिफ अन्सारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ज्या आरोग्य उप केंद्राना इमारत आहे अशा उप केंद्रासाठी जानेवरी 2018 मध्ये बळकटीकरण व अबंधीत निधी प्राप्त झाला असून आपण अद्याप पर्यन्त या निधीचे वाटप केले नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र निधी का दिला नाही या प्रशनाची उत्तर देण्याचे त्यांनी टाळले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें