मानवतरोड रेल्वेगेट जवळ अपघात प्रकरणी वाहन चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकाची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 3 मई 2018

मानवतरोड रेल्वेगेट जवळ अपघात प्रकरणी वाहन चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकाची मागणी.

मानवतरोड रेल्वेगेट जवळ अपघात प्रकरणी वाहन चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकाची मागणी.

मानवत पोलीस स्टेशन येथे नातेवाईकाचे आंदोलन.


मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.०३: मानवत तालुक्यातील मानवतरोड रेल्वेस्टेशन येथील रेल्वेगेटवर दि.२ मे रोजी संध्याकाळी ५-३० वाजता भरधाव आयशरने उभे आसलेल्या दोन मोटरसायकलीना जोरदार धडक दिली यात मानवतरोड येथील रहीवासी  विशाल पवार वय १४ वर्ष हा जागेवर   ठार झाला होता व यात तीनजन गंभीररित्या जख्मी झाले होते या प्रकरणी पोलीसांनी आयशर चालक व मालक यांच्यावर गु.र.नं.७७/१८ क ३०४(अ) विविध कलमाअंतर्गत  भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पो.हे.कॉ.एस.एस.सावंत करीत आहेत  परंतु मृत मुलाच्या नातेवाईकांनी व आदिवासी पारधी विकास परिषद संघटनाचे वतीने  आज दि.३ मे रोजी ११ वाजता पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस निरीक्षक प्रदिप पालीवाल यांना निवेदन देऊन संबधित चालक याने मद्यधुंद आवस्थेत निष्काळजीपणाने वाहन  चालवुन धडक दिली असुन त्याच्यांवर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आंदोलन केले यावेळी मानवतचे नगरसेवक राजुभैय्या खरात यांनी मध्यस्थी करत नातेवाईकाची समजुत काढली व नातेवाईकाचे आक्रोश बघत पोलीस निरीक्षक प्रदिप पालीवाल यांनी सदर वाहन चालक व मालक यांच्यावर सदोष मणुष्यवधाचा गुन्हाखाली कायदेशीर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले या नंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले.या निवेदनावर आदिवासी पारधी विकास परिषद संघटनाचे जिल्हाध्यक्ष मधुकर काळे,भारत पवार,राजाराम काळे,शिवाजी पवार,रंगनाथ काळे,श्रावण पवार,सुंदर पवार,रामा पवार,राजु खरात,अशोकदादा पंडित यांच्या स्वाक्षरी आहेत यावेळी पारधी समाजातील महिला व पुरुष  मोठ्याप्रमाणात उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें