दुधना नदी पात्रात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांना ग्रामस्थांनी पकडले.
एका पोकलॅड सह दोन हायवा टिप्पर वर कार्यवाही .
सेलू: प्रतिनिधी
समशेर खान.
तालुक्यातील दुधना नदी पात्रत वाळू उपसा हा आता नवा राहिला नाही.कोठे वाळू चोरी तर कोठे मर्यादा पेक्षा जास्त उत्खनन असा प्रकार पहायला मिळत आहे. महसूल प्रशासना सोबत वाळू तस्करी साठी चाललेल्या या लपंडावात आता थेट ग्रामस्थ उतरल्याने वाळू तस्कर व ग्रामस्थ यांच्यात खटके उडतआहेत. यातूनच घडलेला हा प्रकार तालुक्यातील
राजवडी येथील ग्रामस्थांनी वाळू उपसा करणारे दोन हायवा टिप्पर सह एक एल अॅन्ड टि कंपनीचे पोकलँड पकडले. त्यानंतर तलाठी हनुमान बोरकर व नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना माहिती देऊन पंचनामा केला व हायवा टिप्पर एम.एच.१६-ए.जी.८५९१,एम.एच.१६-ए.जी.६७६२ तहसील कार्यालयात जमा करून पोकलॅड वालूरचे मंडळ अधिकारी व कवडन सज्जचे तलाठी यांच्या ताब्यात देण्यातआली आहे.
तालुक्यातील राजवाडी येथील वाळू ठेक्यावरून वाळू उपसा होत असून रॉयल्टीचा नावाखाली क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा होत आहे. अशी तक्रार राजवाडी येथील ग्रामस्थ ॲड रामेश्वर शेवाळे व अन्य पाच जणांनी 24 एप्रिल 2018 रोजी एका निवेदनाद्वारे साहाय्यक जिल्हा अधिकारी राहूल कर्डिले यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली होती. तरी देखील राजवाडी व काजळी रोहीणा या दोन्हीही ठिकाणी दुधना नदी पात्रात रॉयल्टीच्या नावाखाली पोकलेन द्वारे होणारा वाळू उपसा चालूच होता. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्षा मुळे राजवाडी येथील ग्रामस्थांनी क्षमतेपेक्षा जास्त उपसा करणा-या राजवाडी येथील नदीपात्रात एक पोकलॅड व दोन हायवा टिप्पर गावकऱ्यांच्या मदतीने ॲड. रामेश्वर शेवाळे यांनी पकडून महसूल प्रशासनाच्या स्वाधीन केले. नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी जागेवरच पंचनामा करून दोन्ही वाहने सेलू येथील तहसील कार्यालयात जमा केले. यामुळे वाळूचे होणारे अवैध उत्खनन थांबले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें