सेलूत सहा रुग्णालयाची तपासणी पूर्ण.रुग्णालयाच्या डॉक्टरांचे पथक संपूर्ण सहकार्य. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 18 मई 2018

सेलूत सहा रुग्णालयाची तपासणी पूर्ण.रुग्णालयाच्या डॉक्टरांचे पथक संपूर्ण सहकार्य.

सेलूत सहा रुग्णालयाची तपासणी पूर्ण.रुग्णालयाच्या डॉक्टरांचे पथक  संपूर्ण सहकार्य.



सेलू प्रतिनिधी
समशेर खान.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील खासगी रुग्णालयाची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून शहरात गुरुवार 16 मे रोजी सहा रुग्णालयाची तपासणी करण्यात आली असून तपासण्यात आलेल्या या सहाही  रुग्णालयातील तपासणीत एकही त्रुटी आढळून आली नसल्याचे तपासणी पथकाचे प्रमुख उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संजय हरबडे यांनी दिली डॉ.हरबडे  यांच्या वैयक्तिक रित्या या पथकांमध्ये औषध निर्माण अधिकारी शंकर अंकुलवार ,अर्जुन सोळंके, पोलीस कर्मचारी प्रदीप हीरक यांनी सहभाग घेतला होता मागील आठवड्यात 14 मे रोजी झालेल्या रुग्णालय तपासणीत शहरात दोन डॉक्टरांच्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर अक्षम्य त्रुटी आढळून आल्या होत्या त्याचा या पथकाने ठोसपणे कार्यवाही होण्याच्या दृष्टीने कायदेशीर कळवून  त्यांना सुधारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असे न केल्यास कारवाईला तोंड द्यावे लागेल इथपर्यंत हे प्रकरण गेल्यावर शहरातील अन्य रुग्णालयाचे डॉक्टर खडबडून जागे झाले आपल्याकडील तपासणीत असा प्रकार घडू नये म्हणून डॉक्टरांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले गुरुवारी तपासणी पथकाने सकाळी 11 वाजता रुग्णालय तपासणी मोहीम हाती घेतली सायंकाळी पाच वाजेपर्यंत अखेरची तपासणी करण्यात आली या पथकाने सुमारे सहा रुग्णालयाची तपासणी केली असता या सहापैकी एकही रुग्णालयात एकही त्रुटी आढळून आली नाही शहरातील  तपासणी करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या पथकास विविध नमुन्यात असलेल्या तपासणीला संपूर्ण सहकार्य केले एकही त्रुटी आढळून आली नसल्याने डॉ. हारबडे यांनी समाधान व्यक्त केले आहे उर्वरित रुग्णालयात कडून देखील अशी अपेक्षा डॉ. हरबडे  यांनी व्यक्त केली आहे शहरात एकूण 65 रुग्णालय आहेत आतापर्यंत 8 रुग्णालयाची तपासणी करण्यात आली आहे दोन रुग्णालयाचे तपासणीनंतर तेथे आढळून आलेल्या त्रुटी व त्यांच्यावर झालेली तक्रार बाजी मुळे शहरातील डॉक्टरांनी घेतलेली धास्ती गुरुवारी झालेल्या तपासणीमुळे कमी झाली आहे परंतु तपासणीच्या मोहिमेतून आपली कधी एकदाची सुटका होते अशी गत शहरातील डॉक्टरांची मात्र झाली आहे 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें