पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ भोकरदन येथें बंद मोटारसायकल मोर्चा.
प्रतिनिधी.शे.सलिम दि.24/05/2018.भोकरदन येथे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ इंटरनॅशनल ह्युमन राईट्स काॅन्सिल च्या वतीने भोकरदन येथें बंद मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला, हा मोर्चा शिवाजी महाराजांच्या पुतळा पासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालय पर्यंत काढून एक निवेदन भोकरदन उपविभागीय अधिकारी हरीशचंद्र गवळी यांच्या मार्फत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठवण्यात आला, या निवेदनात मागणी करण्यात आली कि शासनांनी तात्काळ पेट्रोल, डिझेल व गॅस दर योग्य दराने आकारण्यात यावे कारण की आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर या तिन वर्षांत पन्नास टक्के पेक्षा कमी आहे आणि शासनांनी मुद्दाम दरवाढी करुन पेट्रोल 85 रुपयांच्या वर नेले. तसेच डिझेल व गॅस पन महाग करण्यात आले असून यांची सुध्दा दर सुरळीत करण्यात यावे. या वेळी इंटरनॅशनल ह्युमन राईट्स काॅन्सिल चे जिल्हा अध्यक्ष इसरार खान दरबार खान पठाण, शिवसेनेचे युवक ता.अध्यक्ष रामेश्वर पाटील जंजाळ, ग्राहक संरक्षण समिती भोकरदन अध्यक्ष अमजद पठाण, सय्यद मोसिन,सामाजिक कार्यकर्ते, असेफ पठाण, संजय दळवी, किरण जाधव, गौतम पगारे, पवन घायळे, किशोर गाडेकर, उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें