उपळी ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 24 मई 2018

उपळी ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न ;

उपळी ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न ;

शासनाकडून योजनांची केवळ घोषणा  प्रत्यक्ष अमलबजावणी मात्र शून्य  - आ.अब्दुल सत्तार.



सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.२४ ) - राजकारणाच्या माध्यमातून विविध विकास कामे करतांना गोरगरिबांच्या अडी - अडचणी सोडविण्याबरोबरच शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील सामान्यांना मिळाला पाहिजे. गोररिबांसाठी या सरकारची एकही योजना नाही परंतु काँग्रेस आघाडी सरकराच्या काळातील योजनांचा लाभही सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात भाजपा शासन अकार्यक्षम ठरले असल्याचा आरोप ग्राम पंचायतीच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलतांना माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी केला आहे.


सिल्लोड तालुक्यातील उपळी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला. उपळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा दि.२४ गुरुवार रोजी आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

आ.अब्दुल सत्तार म्हणाले की उपळी येथील सरपंच - पदाधिकारी यांनी कमी कालावधीत अनेक योजना राबविण्याचे काम हाती घेतले आहे. गावासाठी कमी कालावधीत एक सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गावा - गावातील गोरगरिबांच्या विविध अडीअडचणी सोडविण्याचे पुण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे , तसेच गावा - गावातील शेतकरी सततच्या दुष्काळी परिस्थिती मुळे होरपळून निघत आहे. दुष्काळी मदतीबरोबरच कर्जमाफी योजना ही फक्त फसवीच ठरत आहे. शेतकरी दुबार पेरणी योग्य तयार होण्यासाठी गाव - परिसरांतर्गत मोठ्याप्रमाणात जलसंधारणाची कामे राबवायला हवीत तरच शेतकरी तग धरुन उभा राहू शकतो. दुबार पिके घेणारा तयार होऊ शकतो असे मतही आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
यावेळी जि. प.उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, उत्तमराव जाधव, सत्तार बागवान (पंचायत समिती सदस्य),भोसले, निकाळजे, निकम (इंजिनिअर), माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, संजय मुरकुटे, राजू बनसोड, सरपंच - नंदू चव्हाण, मुरलीधर शेजूळ, रवि काळे, संजय तायडे, सरपंच - मिराबाई सुरडकर, उपसरपंच भगवान नाईक, नंदाबाई औटे, संध्याबाई शेजूळ, प्रविण शेजूळ आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें