पवनपुत्र सेवाभावी संस्थेच्या निवेदनाची घेतली दखल ,ग्रामीनरुग्णालयात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची झाली सोय.
प्रतिनिधी-शे.सलिम.भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तसेच नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती.त्यामुळे रुग्णांचे पाण्यावाचून हाल होत होते.ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची गैरसोय होत असल्याने तसेच रुग्णालयातील शौचालय पाणी नसल्याने बंद राहत असल्याने भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील पवनपुत्र सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णालयात रुग्णांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी हरीशचंद्र गवळी यांच्याकडे दि 21 मे रोजी देण्यात आले होते.नसता आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.त्याची दखल रुग्णालयाने त्वरित घेऊन रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. तसेच पाण्याअभावी बंद असलेले शौचालय सुद्धा चालू झाले असून त्यात सुद्धा पाणी सुरळीत चालू झाले आहे.
प्रतिक्रिया-रुग्णांसाठी जर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव कुठलेच नाही.त्यामुळे संस्थेच्या वतीने रुग्णांसाठी पिण्याची पाण्याची मागणी केली होती.त्याची दखल प्रशासनाने त्वरित घेतल्याने मानसिक समाधान लाभले.परंतु यापुढे जर पुन्हा असे आढळून आले तर रुग्णालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. नारायण लोखंडे-संस्थाप्रमुख भोकरदन येथील रुग्णालयात पाण्याची उपलब्धता तपासताना संस्थेचे नारायण लोखंडे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें