ज्ञानोबा माऊली च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. श्री.संत ज्ञानेश्वर माऊली मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. देशाला संत विचाराची गरज - आ. अब्दुल सत्तार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 मई 2018

ज्ञानोबा माऊली च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. श्री.संत ज्ञानेश्वर माऊली मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. देशाला संत विचाराची गरज - आ. अब्दुल सत्तार.

ज्ञानोबा माऊली च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.


श्री.संत ज्ञानेश्वर माऊली मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न.


देशाला संत विचाराची गरज - आ. अब्दुल सत्तार.


शे.कलिम.
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.8, सिल्लोड शहरातील पूर्णेश्वर गणपती संस्थान जवळ नव्याने जीर्णोद्धार झालेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात सोमवार ( दि.7 ) रोजी विधिवत कार्याने ''माऊलीचा '' प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.
यावेळी माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर, नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर ,उपसभापति नंदकिशोर सहारे,गणेशराव दौड, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड , आदींची उपस्थिती होती.

तरुण वर्गातील वाढते व्यसन, गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच  जनकल्याणासाठी देशाला आज खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे , आणि संतांचे विचार जनसामान्यांत पोहचविण्याचे काम वारकरी संप्रदाय नियमित करीत आले आहे.सिल्लोड येथील नव्याने जीर्णोद्धार झालेल्या या माऊली मंदिरात वारकरी शिक्षणाची सुविधा निर्माण झाली पाहिजे अशी इच्छा व्यक्त करीत यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही आ. अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.  ज्यांच्या नावात ज्ञान आहे अशा ज्ञानेश्वर माऊलीच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आज होत असल्याने हा संजीवन सोहळा कायम आठवणीत राहील अशा शब्दात आ. अब्दुल सत्तार यांनी या सोहळ्याची प्रशंसा करून शुभेच्या दिल्या.

 या सोहळ्यानिमित्त 1 मे पासून  अखंड हरिनाम सप्ताह तसेच ज्ञानेश्वर पारायण सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात दररोज सायंकाळी हरी कीर्तन, काकडा, हरिपाठ भाविकांसाठी महाप्रसाद असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.

सोमवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, दत्तात्रय भवर, सखाराम वाघ, योगेश वाकडे, रामेश्वर हडोळे, जितेंद्र  आंबेकर , विनायक कुदळ ,पांडुरंग डवणे,यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत मूर्ती  पूजन, कलश पूजन व महायज्ञ पूजा करण्यात आली. प्रारंभी कलश अनावरण सोहळा व त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सम्पन्न झाला. आळंदी येथील ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत यांच्या काल्याच्या कीर्तनाने या भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ह.भ.प. कापरसिंग महाराज, प्रल्हाद चव्हाण, त्रंबक महाराज काकडे, मनोज महाराज भाग्यवंत, शिवा वाघ, ज्ञानेश्वर काकडे, दत्ता भवर, कमलाकर पिंगळकर , दत्ता शेजुळ, संजय जाधव, सतीश ठाकूर, राजेन्द्र बनसोड, बाबुराव वाकडे, देविदास वाकडे , दिगंबर वाघ, जगन कूदळ आदींसह सावता भजनी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
 या सोहळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी दररोज सकाळी व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी येथे अन्नदान केले. तर समाप्तीच्या दिवशी नगर परिषदेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोबतच  सप्ताह दरम्यान नगर परिषदेने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रखर विद्युत व्यवस्था , स्वच्छता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
फोटो कैप्शन :- 1 ) सिल्लोड येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी बोलतांना माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार 2) सिल्लोड येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रसंगी मंदिर संस्थांच्या वतीने माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कापरसिंग महाराज, त्र्यंबक महाराज काकडे, मनोज भाग्यवंत , दत्ता भवर , कमलाकर पिंगळकर आदी दिसत आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें