खरिप हंगामासाठी शेतक-यांना तात्काळ विनाविलंब कर्जपुरवठा करा - आ.अब्दुल सत्तार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 मई 2018

खरिप हंगामासाठी शेतक-यांना तात्काळ विनाविलंब कर्जपुरवठा करा - आ.अब्दुल सत्तार.

खरिप हंगामासाठी शेतक-यांना तात्काळ विनाविलंब कर्जपुरवठा करा - आ.अब्दुल सत्तार.


विभागीय आयुक्तांना निवेदन सादर;





सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.०८ ) -

खरिप हंगामासाठी ( २०१८ - २०१९ ) पेरणी व इतर शेतीउपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी तात्काळ विनाविलंब कर्जपुरवठा करण्यासाठी बँकेसह व संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत तसेच शेतक-यांना बांधांवर खते व उत्कृष्ट दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन देण्यास आदेशीत करावेत असी मागणी माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी मराठवाडा विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महिनाभरात ( २०१८ - २०१९ ) खरिप हंगाम सुरु होणार असुन हवामान खात्याने पाऊस वेळेवर होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.सतत तीन वर्षांपासुन महाराष्ट्रासह संपुर्ण मराठवाड्यातील शेतक-यांना दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. शेतीमालाला रास्त भाव नसणे, कपाशीवरील बोंडअळींच्या थैमान यांसह इतर कारणांमुळे शेतकरी होरपळून निघालेला आहे. शेतकरी - शेतमजुर कर्जबाजारीपणामुळे हवालदिल होऊन दिवसेंदिवस आत्महत्या करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदा हवामान खात्याने पाऊस वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पण कर्जबाजारीपणामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आलेला असतांना पेरणीसाठी बि - बियाणे खते शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. शेतक-यांचे मनोबल व धैर्य खचू नये म्हणून या खरिप हंगामासाठी पेरणी व इतर शेतीउपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी तात्काळ कर्जपुरवठा करण्यासाठी बँकांना व संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत तसेच शेतक-यांना बांधांवर खते व उत्कृष्ट बियाणे उपलब्ध करुन देण्यासही आदेशीत करावेत असी मागणी माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें