सोनपेठ येथे अँब्युलन्सचा वाढदिवस साजरा.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि. ०७मे २०१८
सोनपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज आरोग्यसंवर्धन मंडळ सोनपेठ, पोलीस ठाणे सोनपेठ व स्थानिक नागरीकांच्या वतीने 108 अँबुलन्सचा चौथा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. दिलीपराव मोकाशे, मंडळाचे अध्यक्ष देविदास भोसले, सपोनि सदानंद येरेकर, डॉ. कल्पेश लांडे, डॉ. पवार, काटे, पोलीस कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
सोनपेठयेथील रूग्णांची मागील चार वर्षापासून अविरत सेवा करणारी 108 अँब्युलन्स गाडी व तीचे चालक काटे, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पेश लांडे व डॉ. पवार हे कार्यरत असल्यांने अनेक रूग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य संवर्धन मंडळ सोनपेठचे अध्यक्ष देविदास भोसले हे सर्वांना बरोबर घेऊन वाढदिवस साजरा करून या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. या वर्षीही प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. दिलीपराव मोकाशे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आशोकराव भोसले, सपोनि मुपडे, पोहेकॉ. अनिल शिंदे, शिवाजी बारबोले, प्रा.डॉ. संतोष रणखांब, पोकॉ. मोरे, पोकॉ. भिसे, आदिंसह पोलीस कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें