जलसंधारण कामे प्रभावीपणे राबविण्याची गरज - आ.अब्दुल सत्तार;
उपळी येथे नदी खोलीकरण कामाचे उदघाटन;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 25शेतकरी दुबार पेरणी योग्य तयार होण्यासाठी गाव - परिसरांतर्गत मोठ्याप्रमाणात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवायला हवीत तरच शेतकरी तग धरुन उभा राहू शकतो.जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविल्यास शेतकरी दुबार पिके घेणारा तयार होऊ शकतो ,असे मत आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सिल्लोड तालुक्यातील उपळी येथे जलयुक्त शिवार योजना अंतर्गत नदी खोलीकरण उपक्रम हाती घेण्यात आला. उपळी गावाजवळील अंजणा नदी खोलीकरण कामाचे उदघाटन माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी जि. प.उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास लोखंडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर,उपसभापती नंदकिशोर सहारे,उत्तमराव जाधव,सत्तार बागवान (पंचायत समिती सदस्य),भोसले ,निकाळजे ,निकम (इंजिनिअर), माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,संजय मुरकुटे,राजू बनसोड,सरपंच - नंदू चव्हाण,मुरलीधर शेजूळ,रवि काळे,संजय तायडे,सरपंच - मिराबाई सुरडकर,उपसरपंच भगवान नाईक,नंदाबाई औटे,संध्याबाई शेजूळ,प्रविण शेजूळ ,काशिनाथ सुरडकर, जनाधन शेजूळ , विट्टल गायकवाड,रामराव फोलने, गणपत औटे,राजेंद्र सुरडकर, विलास शेजूळ , प्रकाश पांढरे,प्रदीप शेजूळ ,विट्टल पांढरे,बंडू काकरवाल, प्रवीण शेजूळ ,सुभाष शेजूळ , मयुर शेजूळ ,योगेश फोलने,संजय सुरडकर आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें