मानवत येथील हरभरा खरेदी केद्रावर कर्मचाऱ्यांकडुन व्यापारी व नातेवाईकांना नोदणीस प्राधान्य ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 25 मई 2018

मानवत येथील हरभरा खरेदी केद्रावर कर्मचाऱ्यांकडुन व्यापारी व नातेवाईकांना नोदणीस प्राधान्य !

मानवत येथील हरभरा खरेदी केद्रावर कर्मचाऱ्यांकडुन  व्यापारी व नातेवाईकांना  नोदणीस प्राधान्य !

[  शेतकरीवर्ग माञ दोन महिण्यापासुन चकरा मारुन मारुन बेजार ]

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२५: मानवत येथील हरभरा खरेदि केद्रावर दोन ते तीन महिण्यापासुन हरभरा विक्रि करण्यासाठि शेतकरीवर्गाकडुन नावनोदणी सुरु आसुन माञ तीन महिण्यापासुन नोदणी केलेल्या शेतकरीनां डावलुन येथील कार्यालयातील कर्मचारि व्यापाऱ्यांची नावे पुढे करत असुन शेतकऱ्यांना माञ चकरा माराव्या लागत आहे यामुळे मानवत येथील शेतकरी अनंदराम राधाकीशन मंञी यांनी दि.२५ मे रोजी मानवत येथील खरेदी विक्रि संघाचे अध्यक्ष यांना निवेदन देऊन संबधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,मानवत येथील शेतकरी अनंदराम राधाकीशन मंञी यांनी हरभरा खरेदिसाठी शासनाने ठरविलेल्या सर्व अटी नियम चे पालन करीत मागील दोन ते अडिच माहिण्यापुर्वी नोदणी केली होती पण त्यांचे व त्याच्या पत्नीने नाव यादीत आलेच नाही व मुलीचे ही नाव यादीतुन वगळण्यात आले आहे.हरभरा खरेदिसाठी नोदणी करताना कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अनंतराम मंञी यांना ५६१,५६२व५६३ हे नंबर देण्यात आले होते परंतु आता त्यांचे यादीतील नंबर ७३४,७३५ हे सागण्यात येत आहे या नंबरचा एवढामोठा फरक कसकाय झाला आहे याची चौकशी करुन चिरीमीरी घेऊन शेतकऱ्यांना डावलुन व्यापाऱ्यांची व जवळील नातेवाईकाची नंबर हे कार्यालयातील कर्मचारि पुढे करत असुन संबधीत कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिलेल्या  निवेदनात करण्यात आली  आहे. या निवेदनावर अनंदराम राधाकीशन मंञी  यांची स्वाक्षरी आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें