श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था(शिर्डी) च्या श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये सुमारे ५ कोटी रुपये किंमतीच्या नविन अत्याधुनिक कॅथलॅब मशिनचे उदघाटन संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
शिर्डी –राजेंद्र दूनबळे (प्रतिनिधी)याप्रसंगी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके, सौ.नलिनी हावरे,उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे,वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे, वैद्यकीय अधिक्षिका सौ.मैथिली पितांबरे, डॉ.प्रितम वडगावे, डॉ.मनोहर शिंदे, प्रशासकीय अधिकारी सुर्यभान गमे व शिमाडझु या कंपनीचे योगेश मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.हावरे म्हणाले, श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय हे दोन रुग्णालय चालवली जातात. यामध्ये श्री साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय रोग, मेंदुरोग, मणक्याचे,अस्थीरोग आदी आजारावर शस्त्रक्रिया केल्या जातात. ज्या रुग्णांकडे पिवळे व केसरी रंगाचे रेशनकार्ड आहे त्यांच्यावर महात्मा फुले जिवनदायी योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. या रुग्णालयात दवा बरोबरच दुवॉ ही दिला जातो. या रुग्णालयाने गेल्या पाच वर्षीत महात्मा फुले जिवनदायी योजनेत राज्यात सर्वाधिक हृदय शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केलेला आहे. या रुग्णालयातील जुने कॅथलॅब मशिन १५ वर्ष वापरुन ते बदलण्यात येवून त्याजागी सुमारे ५ कोटी रुपये किंमतीचे जपानाच्या शिमाडझु या कंपनीचे अत्याधुनिक मशिन बसविण्यात आले आहे. या मशिनची गॅरटी १० वर्षाची असून ५ वर्षाची सर्व्हिस वॉरंटी आहे. या मशिनची २५० शस्त्रक्रिया करुन चाचणी ही केली आहे.
संस्थानच्या या रुग्णालयाकरीता अत्याधुनिक एम.आर.आय व सिटी स्कॅन मशिन घेण्यात येणार असून सुमारे २५० विविध मशिनरी लवकरच बदलण्यात येतील. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांसह मशिनरीच्या बाबतीत हे रुग्णालय अत्याधुनिक होईल असे सांगून राज्यातील अधिकाधिक रुग्णांनी संस्थानच्या या रुग्णालयाचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ.हावरे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें