मारवाड़ी येथील सरपंच ग्रामसेवक व अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करून शौचालयाचे बोगस बिले काढली.
जिल्हा अधिकारी यांच्या कडे निवेदन देऊन कारवाईची केली मागणी.
कौसडी प्रतिनिधी शेख नईम
जिंतुर तालुक्यातील मारवाड़ी येथील सरपंच ग्रामसेवक व अधिकारी यांनी पदाचा गैर वापर करून शौचालयाच्या कामाचे बोगस बिले काढुन हजरो रूपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मारवाड़ी येथील गावक-यांनी केला आहे
दिनांक 23 मे बुधवार रोजी गावक-यांनी मीळुन जिल्हा अधिकारी परभणी तहसीलदार जिंतुर व गटविकास अधिकारी प. स.जिंतुर यांच्या कडे निवेदन देऊन सरपंच ग्रामसेवक व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे
एका शौचालयावर दोन-दोन वेळेस बोगस बिले काढली व ज्याच्या नावावर घर जागा नसतांना देखील शौचालय बांधकाम न करता आसे बरेच बोगस बिले ऊचलली व तसेच
मागील दोन वर्षा पासुन सरपंच व ग्रामसेवकांणी ग्रामसभा ही घेतलेलीना 1 मे रोजी महाराष्ट्रदिना निमित्त ध्वजारोहण सुध्दा केले नाही
सरपंच ग्रामसेवक व अधिकारी यांनी पदाचा गैर वापर करू शौचालयाचे बोगस बिल काढली व भ्रष्टाचार केले शासनाने या सर्वांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची गावातील नागरिकांनी मागणी केली या निवेदनावर रावसाहेब देशमुख,बाजीराव देशमुख,रवीकांत देशमुख,गजानन देशमुख,राम देशमुख,माणीकराव देशमुख यांच्या सह आदि गावक-यांचे स्वाक्ष-या आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें