देवगिरी मध्ये प्रवासी व फेरीवाल्यां मध्ये हाणामारी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 24 मई 2018

देवगिरी मध्ये प्रवासी व फेरीवाल्यां मध्ये हाणामारी.

देवगिरी  मध्ये प्रवासी व फेरीवाल्यां मध्ये हाणामारी.

सेलू प्रतिनिधी.समशेरखान.
क्षुल्लक कारणावरून नागपूर-मुंबई या देवगिरी एक्सप्रेस मध्ये प्रवासी आणि फेरीवाल्या यामध्ये हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली याप्रकरणी सेलू रेल्वे पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगिरी एक्सप्रेस मध्ये परभणीहून 13 जणांचा समूह ठाणे येथे जाण्यासाठी देवगिरी एक्सप्रेस जनरल डब्यामध्ये बसला होता प्रवाशांची गर्दी असतानाच फेरीवाले आणि प्रवाशी तरुण मोबाईलवर पाय पाडल्याच्या कारणावरून वाद झाला व वादाचे रूपांतर हाणामारीत झाले देवगिरी एक्सप्रेस रेल्वे गाडी सेलू रेल्वे स्थानक रात्री 9:35 वाजता उभी राहताच फेरीवाले आणि तरुणांच्या गटात पुन्हा हाणामारी सुरू झाली एकच गोंधळ उडाला आरडाओरड सुरू झाले रेल्वे पोलिसांनी डब्याकडे धाव घेऊन या तरुणांना ताब्यात घेतले त्यानंतर देवगिरी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाली दरम्यान फेरीवाले आणि तरुण मुलांच्या समूहात हाणामारी झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला याप्रकरणी रितेश ठाकूर रा ठाणे यांच्या तक्रारीवरून संदीप घारे व ज्ञानेश्वर झेंडे यांच्याविरोधात रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रेल्वे पोलीस थिठे यांनी दिली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें