अब्रू वाचवण्यासाठी महिलेचा दुर्गावतार; नराधमाचे कापले गुप्तांग. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 2 मई 2018

अब्रू वाचवण्यासाठी महिलेचा दुर्गावतार; नराधमाचे कापले गुप्तांग.

अब्रू वाचवण्यासाठी महिलेचा दुर्गावतार; नराधमाचे कापले गुप्तांग.

बलात्कार करण्यासाठी घरात घुसलेल्या नराधमापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी एका महिलेने दुर्गावतार घेतला. महिलेने नराधमाला घरातील एका खांबाला बांधले आणि नंतर त्याचे गुप्तांगच कापल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली.‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार बसरेहर तालुक्यातील गावात राहणारी महिला मंगळवारी रात्री घरी एकटीच होती. यादरम्यान रात्रीच्या अंधारात एक नराधम तिच्या घरात घुसला. त्याने पीडित महिलेला पकडले देखील होते. मात्र, महिलेने धाडस दाखवत त्याला प्रतिकार केला. इतकच नव्हे त्या नराधमाला घरातील खांबाला बांधले आणि त्यानंतर घरातील चाकूने त्याचे गुप्तांग कापले. यानंतर महिलेने पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी नराधमाला सैफईतील रुग्णालयात दाखल केले असून रात्री उशिरा महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें