विकास कामांचा धसका घेतलेल्या विरोधकांची लोणीकरांविरुद्ध फुसकी स्टंटबाजी.
भाजप तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे यांची प्रतिक्रिया.
मंठा (प्रतिनिधी)
विडोळी येथील कार्यक्रमाच्या यशस्वितेनंतर कार्यक्रमाचं यश ज्यांच्या डोळ्यात खुपलं त्यांनी पालकमंत्री बबनराव लोणिकर निघून गेल्यानंतर बालिशपणाची स्टंटबाजी केली अशी प्रतिक्रिया भाजप मंठा तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे यांनी दिली.
काल विडोळी बुद्रुक येथे विविध विकास कामांच्या उदघाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री ना बबनराव लोणीकर आले होते, यावेळी लोनिकारांच्याहस्ते विडोळी ते मंगरूळ रास्ता डांबरीकरण व मजबुतीकरण, विडोळी ग्रामपंचायत कार्यालय भूमिपूजन व विडोळी खुर्द व बुद्रुक अशा दोन्ही गावातील गाव अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईन चे भूमिपूजन करण्यात आले.
पालकमंत्री हे नेहमी प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असतात हे अनेकदा दिसून आले असताना विरोधकांनी ते निघून गेल्यानंतर महिलांना पुढे करत फुसकी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला.
प्रत्यक्षात विडोळी खुर्द किंवा बुद्रुक या दोन्ही गावांनी टंचाई बाबत कोणताही प्रस्ताव पंचायत समिती, तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर यांच्याकडे प्रलंबित नाही किंवा दाखलही करण्यात आलेला नाही. पाणीटंचाई बाबत प्रस्ताव आल्यास 24 तासात पाणीपुरवठ्याची सोय करून देण्याबाबत पालकमंत्री महोदयांच्या सूचना आहेत, अशी माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी यावेळी दिली.
गावात 4 पैकी 2 हातपंप सुरु असून गावाच्या पाण्यासाठीचा उद्भव विहीर आहे, त्याद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात असून भारनियमनामुळे थोडा विस्कळीतपणा येत असल्याचे यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती झरे यांनी सांगितले.
याही पलीकडे जाऊन पाणी टंचाईबाबत कोणताही परिपूर्ण ठराव आल्यास त्याबाबत 24 तासात कार्यवाही केली जाईल असे तहसीलदार गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
तालुक्यातील विहीर अधिग्रहण किंवा टँकरबाबत जेवढे काही प्रस्ताव आले होते ते सर्व निकाली काढले असून आज रोजी एकही प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे तहसीलदार गायकवाड म्हणाले.
====================
गावासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला भरपूर पाणी असून गावात नियमित पाणीपुरवठा केला जातो, भार नियमनामुळे कधीकधी अडथळा येतो, परंतु टँकर किंवा विहीर अधिग्रहण करण्याची परिस्थिती नाही त्यामुळे ग्रामपंचायतीने तशी कोणतीही मागणी प्रशासनाकडे केलेली नाही, सदरील वस्ती गावापासून 2 कि मी दूर असून त्याठिकाणी 25 चा एक ट्रान्सफार्मर आहे परंतु वीज जोडणी मात्र एकच आहे त्यामुळे अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो, म्हणून पाणीपुरवठा करताना अनेकदा अडचणी येतात, आज मंत्री महोदयांच्या हस्ते याठिकाणी पाणीपुरवठा करता यावा यासाठी अंतर्गत पाईपलाईन चे उदघाटन करण्यात आले परंतु पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून त्यातून त्यांनी ही फुसकी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही अशी प्रतिक्रिया सरपंच रामकीसन आवचार यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें