विजबील दुरुस्ती साठी ग्राहकाचा आत्महत्येचा ईशारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 22 मई 2018

विजबील दुरुस्ती साठी ग्राहकाचा आत्महत्येचा ईशारा.

विजबील दुरुस्ती साठी ग्राहकाचा आत्महत्येचा ईशारा.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२२मे २०१८
सहा वर्षापासुन वीजबिल दुरुस्तीसाठी अर्जबाजी करून कंटाळलेल्या ग्राहकाने वीजमंडळास वितरण कंपनीसह जिल्हाधिकारी परभणी, तहसीलदार सोनपेठ, पोरीस स्टेशन सोनपेठ यांच्यासह विज वितरण कंपनीच्या उप अभियंत्यास जबाबी टपालाने विज बिल दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला असून अर्जाचा विचार न झाल्यास आत्महत्येचा ईशारा दिला आहे.
सोनपेठ येथील संभाजीनगर परीसरातील पिठाची गिरणी चालवणाऱ्या भिमराव महामुनी यांनी विजबील दुरुस्तीसाठी आत्महत्येचा ईशारा दिला आहे. भिमराव महामुनी यांना साल २०१२ साली जुन महिन्यात १४७९० रु. बील आले अवाजवी असलेले बिल दुरुस्त करावे या साठी त्यांनी २४/०७/२०१२ साली विज वितरण कंपनी कडे अर्जही दिला. या अर्जाची कुठलीही दखल न घेता कंपनीने त्यांचे मीटर बंद केले. वारंवार विनंती अर्ज केल्यानंतर दहा हजार रुपये भरुन घेऊन त्यांचे मीटर चालु करुन देण्यात आले. त्यानंतरही त्यांना विज बिल दुरुस्त करुन न देता दरमहा सरासरी पाच हजार रुपये बिल आकारल्या जाते. गेली सहा वर्षे महामुनी सरासरीनेच बिल भरत आहेत. हे बिल दुरुस्त करुन देण्यासाठी त्यांनी विज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्या पासुन राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांना विनंती अर्ज केले पण विज बिल दुरुस्त करुन मिळण्या ऐवजी कंपनीचे कर्मचारी पुर्ण बिल भरा अन्यथा विद्युत पुरवठा खंडीत करण्याच्या धमक्या देत असल्याने; विजवितरण कंपनीच्या कारभारास कंटाळलेल्या महामुनी यांनी जिल्हाधिकारी परभणी, तहसीलदार सोनपेठ, पोरीस स्टेशन सोनपेठ यांच्यासह विज वितरण कंपनीच्या उप अभियंत्यास जबाबी टपालाने विज बिल दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला असुन यात त्यांनी आपली उपजिविका पिठाच्या गिरणीवर अवलंबुन असल्याचे व चुकीच्या व वाढत्या अगाऊच्या बिलाच्या दबावामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे नमुद केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें